जो भी हमसे टकराएगा, वह चूर-चूर हो जाएगा – ममता बॅनर्जी 

कोलकत्ता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये मौखिक युद्ध सुरु आहे. रमजान ईदनिमित्त मुस्लीम बांधवांना संबोधित करताना ममता बॅनर्जींनी पुन्हा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. घाबरण्याची गरज नाही. जो भी हमसे टकराएगा, वह चूर-चूर हो जाएगा, असे ममता बॅनर्जींनी म्हंटले आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या कि, त्याग म्हणजे हिंदू, ईमान म्हणजे मुस्लिम, प्रेम म्हणजे ख्रिश्चन, बलिदान म्हणजे शीख असा आपला सुंदर भारत आहे. याचे रक्षण आपल्याला करायचे आहे. जो भी उनसे टकराएगा, वह चूर-चूर हो जाएगा, ही आमची घोषणा आहे. ममतादीदी शायरीत म्हणाल्या, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूर-ए-खुदा होता है. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे कठोर असतात. परंतु, नंतर ती सौम्य होतात. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. ज्या गतीने त्यांनी ईव्हीएमवर कब्जा केला. त्याच गतीने ते निघूनही जातील, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये जय श्रीरामाच्या घोषणेवरून चांगलाच वाद उफाळला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.