जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी ‘मुफ्ती यासिर’ला कंठस्नान

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मुफ्ती यासिर याला कंठस्नान घालण्यात आले आहे. पोलीस महासंचालक एसपी वैद यांनी आपल्या ट्वीटरवरुन ही माहिती दिली आहे.

वैद यांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे की, ‘त्रालमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशनल कमांडर मुफ्ती यासिरही मारला गेला.’ यासिर हा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसहूद अझहर याचा उजवा हात मानला जायचा. त्रालच्या जंगलात दहशतवादी लपल्याचं माहिती मिळताच राज्य पोलीस, सीआरपीएफ आणि सुरक्षा दलांनी संयुक्तपणे ऑपरेशन सुरु केलं होतं. याच ऑपरेशनदरम्यान यासिरला ठार करण्यात आले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)