जैवविविधता संवर्धनात पुणे उणे

समित्या स्थापनेबाबत अनास्था : सातारा जिल्ह्यांत शंभर टक्के काम

पुणे – ज्या ठिकाणी जैवविविधता आहे, तिचे संवर्धन व्हावे यासाठी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेला जैवविविधता समिती स्थापन करण्याचा आदेश दोन वर्षांपूर्वी ग्रामीण विकास मंत्रालयाने देऊन देखील पुणे जिल्ह्याने त्याची अंमलबजावणी केलेली नाही. पुणे विभागात इतर जिल्ह्यांचे काम शंभर टक्के झालेले असताना पुणे जिल्ह्याचे काम केवळ 30 टक्केच झाले आहे. खरंतर सर्वाधिक जैवविविधता पुणे जिल्ह्यात असताना ते जपण्यासाठी ठोस पावले जिल्हा परिषदेने उचलले नसल्याची खंत जैवविविधता मंडळाकडून व्यक्त केली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्र सरकारने देशातील जैवविविधता जपण्यासाठी प्रत्येक राज्यात जैवविविधता मंडळाची स्थापना केली. या मंडळातर्फे प्रत्येक जिल्ह्यातील जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांवर जबाबदारी देण्यात आली आहे. त्या संदर्भातील अध्यादेश ग्रामीण विकास विभागाने मे 2013साली काढला आहे. त्यानुसार अनेक जिल्ह्यात काम सुरू झाले आहे. तसेच राष्टलीय हरित लवादाने देखील ज्या जिल्ह्यात जैवविविधता समित्या स्थापन झाल्या नाहीत, त्यांनी सहा महिन्यात त्या कराव्यात, असा आदेश दिला आहे. येत्या फेब्रुवारी 20019 मध्ये त्याची मुदत संपत आहे. एवढे होऊन देखील पुणे जिल्हा मात्र अजूनही त्याबाबत जागरूक झाल्याचे दिसून येत नाही. आतापर्यंत 1402 समित्या स्थापन होणे अपेक्षित होते. परंतु, केवळ 344 समित्याच स्थापन झाल्या आहेत.

जिल्ह्यातील सुमारे नऊ तालुके हे पश्‍चिम घाटाच्या पट्ट्यात येतात. त्यात जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी आदी तालुक्‍यांचा समावेश आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्या जैवविविधतेने संपन्न आहे. त्याचे संवर्धन होणे आवश्‍यक आहे. पण त्याबाबत पुणे जिल्हा परिषद मात्र काहीच हालचाल करीत नसल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)