जेसिका लाल हत्याप्रकरण : जेसिकाच्या बहिणीनं मारेकऱ्याला केलं माफ

नवी दिल्ली : मॉडेल जेसिका लाल हत्याप्रकरणात तुरुंगात असलेला सिद्धार्थ वशिष्ठ उर्फ मनू शर्माला जेसिका लालच्या बहिणीने माफ केले आहे. जेसिकाच्या हत्येप्रकरणी मनू शर्मा जवळपास १५ वर्ष तुरुंगात होता. ‘माझ्यासाठी हे पुरेसं आहे. त्यामुळे त्याला तुरुंगवासातून मुक्त केल्यास माझा कोणताही आक्षेप नाही’, असे पत्र जेसिकाच्या बहिणीने तिहार तुरुंग प्रशासनाला पाठवले आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, जेसिका लालची बहीण सब्रिना म्हणते, जेसिकाच्या मारेकऱ्याला मी माफ केले आहे. माझ्या मनात आता कोणताही राग किंवा द्वेष नाही. माझ्या बहिणीच्या हत्येसाठी तो १५ वर्षांसाठी तुरुंगात होता. माझ्यासाठी हे देखील पुरेसे आहे, असे तिने तुरुंग प्रशासनाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, दिल्लीत बारटेंडर म्हणून काम करणाऱ्या जेसिका लालची २९ एप्रिल १९९९ रोजी हत्या करण्यात आली होती. काँग्रेसचे नेते विनोद शर्मांचा मुलगा मनू शर्मा हा या प्रकरणातील आरोपी होता. मनू शर्माला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून तो सध्या तिहार कारागृहात शिक्षा भोगत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)