जेव्हा आस्तादमधला देशभक्त जागा होतो तेव्हा…

टीव्हीवर आपण केवळ एक तास बिग बॉस पाहत असलो तरी, वूटच्या वेबसाइटवर बिग बॉसच्या घरातील अनेक व्हिडिओ प्रेक्षकांना पाहता येतात. याच साइटवरच्या एका व्हिडिओमध्ये आस्ताद इतर सदस्यांना एक अनुभव सांगताना दिसला. आस्ताद फारच देशभक्त आहे. आपला देश आणि संरक्षण दलांबद्दल त्याला कमालीचा आदरही आहे. ही भावना सांगताना त्यानं एक प्रसंग शेअर केला आहे. 

आस्ताद एकदा एक कार्यशाळा संपवून रात्री उशिरा ट्रेननं घरी जात होता. या प्रवासात फर्स्ट क्लासच्या डब्यात एक व्यक्ती पोलीस आणि देशाच्या संरक्षण दलाबद्दल नकारात्मक बोलत होता. आस्तादला त्याची ती भाषा, त्याचं बोलणं असह्य झालं आणि तो जाऊन त्याच्यासमोर उभा राहिला. देशाबद्दल इतका राग का आहे, असं त्याला विचारून काही कळण्याच्या आत आस्तादनं त्याला चोप दिला. आस्तादनं नंतर त्याला रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. त्याला अटक व्हावी, अशी त्याची मागणी होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)