जेलमध्ये राहून घेतल्या 34 पदव्या

नायगाव – पुरंदर तालुक्‍याच्या पूर्व भागातील राजुरी माध्यमिक विद्यालयात तुरुंगात 17 वर्ष राहून 4 पदव्या व 8 पदविका घेणारे सतीश मुरलीधर शिंदे यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोपी म्हणून जेलमध्ये गेल्यानंतर समाजात त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो; परंतु शिंदे यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश प्राप्त करून केले. त्यांनी एकूण 34 पदव्या घेतल्या आहेत. आपल्या मनोगतात सतीश शिंदे यांनी आपला संपूर्ण जीवनपट विद्यार्थ्यांना सांगितला. ते म्हणाले की, शिक्षण घेण्यास परिस्थिती आड येत नाही. त्यासाठी मनाची इच्छाशक्ती प्रबळ असावी लागते. मनात इच्छा असेल तर आपण यश प्राप्त करू शकतो.

या कार्यक्रमासाठी प्राचार्य शांताराम राणे, नवजीवन मंडळाचे अध्यक्ष सु. प. रानडे, सचिव भारती सोमाणी, अर्चना दावत्रय, शेखर मोहिते, महादेव गायकवाड, दत्तात्रय वायसे, कल्पना जगताप, सरला शितोळे समवेत विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन नसीर बागवान यांनी केले तर अण्णासाहेब खेडकर यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.