जेठमलानी कायम स्मरणात राहतील – मोदी

नवी दिल्ली – माजी कायदामंत्री राम जेठमलानी यांच्या निधनाुळे भारताने कार्यशिल वकील गमावला असल्याची भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली आहे. “आणीबाणीच्या काळात लोकांच्या स्वातंत्र्यासाठी विचलित न होता त्यांनी लढा दिला होता. त्यासाठी ते कायम आपल्या स्मरणात राहतील”, अशा शब्दांमध्ये मोदींंनी ट्विटरवरून जेठमलानी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मोदी म्हणतात की  “जेठमलानी यांच्या जाण्यामुळे भारताने अनन्य साधारण वकील गमावला आहे. जेठमलानी हे असं आदर्श व्यक्तिमत्त्व होत ज्यांनी वकिली आणि संसद या दोन्हींमध्ये अमूल्य योगदान दिले. त्यांचा स्वभाव धाडसी आणि विनोदी होता. तसेच ते कोणत्याही विषयावर बिनधास्त मत मांडायचे”

“जेठमलानी यांच्याशी असंख्यवेळा बोलण्याची संधी मिळाली. हे मी माझ भाग्य समजतो. या दुःखाच्या काळात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंब, मित्र आणि चाहत्यांसोबत आहेत. ते आता आपल्यात नसले तरी त्यांनी केलेल काम सदैव आपल्या सोबत राहिल”, अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.