“जेट पॅचर’प्रकरणी आता चौकशी

ठेकेदार, अधिकारी रडारवर : सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांची ग्वाही

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाने खड्डे बुजविण्यासाठी “जेट पॅचर’ मशीनचे सुमारे साडेआठ कोटींचे काम काढले आहे. परंतु, त्याचा फायदा होत नसून या ठेकेदाराला एक खड्डा बुजवण्यासाठी महापालिका 18 हजार रुपये देत आहे. ही बाब समोर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी-चिंचवड शहरात रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी जेट पॅचर पोथॉल पॅचिंग मशिन हे नवीन तंत्रज्ञान वापरण्याबाबतची निविदा इ प्रभागाकडून काढण्यात आली होती. हे काम तिन वर्षांसाठी मे. अंजनी लॉजिस्टिक या ठेकेदाराला 8 कोटी 32 लाख 41 हजार 772 रुपयांमध्ये देण्यात आले आहे. परंतु, ठेकदार चार महिने काम करणार असून सुमारे 1500 खड्डे बुजविणार आहे. त्यानुसार त्याला एका खड्ड्यासाठी 18 हजार रुपये खर्च दिला जात आहे. त्यावर आरोप होऊ लागले असून या निविदाप्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी होत आहे. त्यानंतर पक्षनेते एकनाथ पवार यांनी चौकशीची ग्वाही दिली आहे. ते म्हणाले की, या जेट पॅचर मशीनच्या कामाची माहिती आपण मागविली आहे. या कामात कुठल्याही प्रकारे चुकीचे कामकाज होत असेल, तर त्याची सखोल चौकशी केली जाईल. अधिकारी, ठेकेदार या चौकशीच दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

मुख्यमंत्र्यांकडेही चौकशीची मागणी…
नागपूर कनेक्‍शन असणारे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह अधिकारी, पदाधिका-यांनी ठेकेदाराशी संगनमत करून नागपूरचे ठेकेदार मे. अंजनी लॉजिस्टिक यांना पोसण्यासाठी पालिका तिजोरीला खड्डा पाडण्याचे काम दिले आहे. यामध्ये करदात्या नागरिकांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे या प्रकरणाची शासन स्तरावरून उच्चस्तरीय चौकशी होऊन यातील दोषींवर कठोर कार्यवाही करावी, अशा मागणीचे पत्र माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठविले आहे.

शहरातील खड्ड्यावरील खर्च पाहता येत्या चार वर्षात सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते शहरात करण्याचा आमचा विचार आहे. यासाठी पुढील महिनाभरात आम्ही धोरणही आकणार आहोत. डांबरी रस्त्यावर पडणारे खड्डे पाहता सिमेंटचे रस्त्यावर खड्डे पडण्याचे प्रमाण हे कमी असेल. रस्ते बांधल्या पासून पुढील 10 वर्ष त्यावर खड्डा पडणार नाही असे धोरण आखण्यात येणार आहे. यामध्ये केवळ मुख्य रस्ते नाही तर अंतर्गत रस्त्यांचाही विचार केला जाणार आहे.
– एकनाथ पवार, सत्तारुढ पक्षनेते, पिंपरी-चिंचवड महापालिका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)