जेट एअरवेजची आणखी तीन विमाने ताफ्याबाहेर

नवी दिल्ली: आर्थिक समस्येत अडकलेल्या जेट एअरवेजने भाड्याचे पैसे न दिल्यामुळे या कंपनीची आणखी तिन विमाने सेवेतून बाहेर पडली आहेत. त्यामुळे कंपनीला अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत.

दरम्यान या कंपनीत स्टेट बॅंक ऑफ इंडियाची 15 टक्‍के इतकी मालकी होऊ शकते असे वृत्त आहे. जेट एअरवेजने आपल्या डोक्‍यावर असलेले कर्ज कमी करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून कर्जाच्या बदल्यात कंपनीत शेअर्स देण्याचा प्रस्ताव दिला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्याचे कर्ज शेअर्समध्ये रूपांतरित करण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी भागधारकांची संमती घेण्याचे जेटने म्हटले होते. नवीन भागधारकांना त्यांचे प्रतिनिधी संचालक मंडळावर नेमता येतील आणि सध्याच्या आर्थिक समस्येवर मात करता येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. जेट एअरवेजमध्ये सध्या 24 टक्के हिस्सा असलेल्या इत्तहाद एअरवेज आणखी गुंतवणूक करण्याची शक्‍यता असून त्यांचा हिस्सा 40 टक्के होईल आणि काही बॅंका त्यांचे कर्ज शेअर्समध्ये रूपांतरित करतील व त्यांना 30 टक्के भागीदारी मिळेल असे बोलले जाते. यामुळे भारतीय स्टेट बॅंकेला बरेच शेअर मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)