“जेट’चे संस्थापक नरेश गोयल यांच्या कार्यालयांवर छापे

दिल्ली, मुंबईतील कार्यालयांचा समावेश

नवी दिल्ली – सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या दिल्ली व मुंबईतील निवासस्थान आणि कार्यालयांवर छापे मारले आहेत. परकीय चलन विनिमय कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांतर्गत हे छापे मारण्यात आले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली.

ते म्हणाले की, हे छापे परकीय चलन विनिमय अधिनियम (फेमा) अंतर्गत मारण्यात आले. पुरावे मिळवण्यासाठी हे छापे मारण्यात आले होते. आर्थिक संकटामुळे 17 एप्रिलपासून जेटची विमाने जमिनीवरच आहेत. सूत्रांनी जुलै महिन्यात सांगितले होते की, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या चौकशी अहवालात कंपनीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार असल्याचे आढळले. गोयल यांनी मार्चमध्ये कंपनीचे अध्यक्षपद सोडले होते. कंपनी सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×