जेजुरी परिसरात दरोडोखोरांची टोळी?

जेजुरी पोलिसांचे पोलीस पाटलांना सतर्कतेचे निर्देश

नीरा-जेजुरी आणि जेजुरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दरोडा टाकण्याच्या तयारीत दरोडेखोरांची टोळी असल्याची माहिती जेजुरी पोलिसांना मिळाली आहे. त्शया अनुषंगाने आज जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी जेजुरी पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या गावातील पोलिस पाटलांची तातडीने बैठक घेऊन सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

  • जेजुरी परिसरात बाहेरील जिल्ह्यातून काही संघटित गुन्हेगार येऊन वास्तव्य करत असून दोन-चार दिवसांत परिसरात मोठ्या प्रमाणात दरोडा टाकणार असल्याची माहिती पोलिसांना काही गुप्त माहितगार मार्फत मिळाली आहे. यानंतर अंकुश माने यांनी तातडीने जेजुरी पोलीस ठाण्यांतर्गत गावातील पोलीस पाटलांची आज जेजुरी पोलीस ठाण्यात बैठक घेतली. यामध्ये आपापल्या गावात दरोड्याची कोणत्या प्रकारची घटना घडणार नाही. या संदर्भात सतर्क राहण्याचे निर्देश दिले. यासाठी ग्रामसुरक्षा दल, पोलीस मित्र संघटना, गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व तंटामुक्त मुक्ती समिती यांनी एकत्र येत गावात सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे व सतर्क राहण्याचे निर्देश दिले. जेजुरी पोलिसांच्या वतीने दररोज रात्री चार वाहनांमधून रात्र गस्त घालण्यात येणार आहे. मात्र ही उपाययोजना पुरेशी नसून दरोडेखोरांचा पूर्वानुभव पाहता ग्रामस्थांनी अधिक सतर्क राहणे व अशा प्रकारचा कोणताही दरोडा पडू न देणे हे महत्वाचे आहे. त्यामुळे गावातील प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येक गावातील पोलीस पाटलांनी लोकांना जागृत करावे गावात येणाऱ्या अनोळखी लोकांची माहिती घ्यावी. त्याचबरोबर गावात नव्याने वास्तव्यास येणाऱ्या लोकांची माहिती घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
  • पर जिल्ह्यातील काही दरोडेखोर जेजुरी परिसरात वास्तव्यास असून ते मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात एक मोबाईल संभाषण हाती लागले आहे. दरोडेखोरांचा पूर्वानुभव पाहता त्यांना तातडीने रोखणे गरजेचे आहे. म्हणून सर्व नागरिकांनी सतर्क राहायला हवे. पोलिसांची दोन पथके या दरोडेखोरांचा तपास करीत आहेत.
    -अंकुश माने, सहायक पोलीस निरीक्षक जेजुरी
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here