जेजुरी गडावर रंगपंचमी उत्साहात

जेजुरी- अवघ्या महाराष्ट्राचा लोकदेव असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची रंगपंचमी येथील नित्य वारकरी, सेवेकरी, पुजारी व ग्रामस्थांनी उत्साहात साजरी केली. सोमवारी (दि. 25) पहाटेचे नित्य वारकरी-पुजारी वर्गाने पारंपारिक कुलधर्म -कुळाचारानुसार भूपाळी विधिवत पूजा अभिषेक करताना नैसर्गिक रंगांचा वापर करीत मुख्य मंदिरात देवांचा रंगोत्सव साजरा केला.

यावेळी मुख्य स्वयंभू लिंगासह मार्तंड भैरव व उत्सवमूर्तींना नैसर्गिक रंग लावण्यात आला. त्यानंतर सेवेकरी, पुजारी वर्गाने एकमेकांना राग लावत पारंपारिक रंगपंचमी उत्सव साजरा केला. यावेळी मल्हारी पिवळा झाला. “हळद लागली हळद लागली बाणाई तुला’ या लोकगीतांच्या ओळी गायल्या जात होत्या. पुण्यातील रंगावलीकार आशा खुडे यांनी गडकोट आवारात खंडेरायाच्या मुख्य मूर्तीची रंगावली रेखाटली होती. अशाच प्रकारे मल्हारी-मार्तंडाचे मूळ ठिकाण कडेपठार मंदिरातही रंगोत्सव साजरा करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.