जेजुरी गडकोट डोंगररांगेत वृक्षारोपण

जेजुरी- मराठवाडा मित्र मंडळाच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना शिबिरा अंतर्गत सुमारे 50 विद्यार्थ्यांनी जेजुरी गडकोट खंडोबा मंदिर व मूळस्थान कडेपठार मंदिर परिसराची स्वच्छता करीत सुमारे 300 झाडांचे रोपण केले. या उपक्रमात पुणे विभागाचे धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख सपत्नीक सहभागी झाले होते. राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डीगे यांच्या सूचनेनुसार राज्यातील उंच डोंगर माथ्यावर असलेल्या देवस्थाने व मंदिराभोवती लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याचे धोरण राबविले जात आहे. त्या अनुषंगाने पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळाच्या विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सुमारे 30 पोती प्लॅस्टिक व कचरा संकलित करण्यात आला. तर जयाद्री डोंगररांगेच्या कुशीत तीनशे झाडांची लागवड केली गेली. दुपारनंतर मल्हारगडाच्या डोंगररांगेत 300 झाडांचे रोपण करण्यात आले. देवसंस्थानचे विश्वस्त पंकज निकुडे पाटील, संदीप जगताप, शिवराज झगडे, व्यवस्थापक दत्तात्रय दिवेकर, पर्यवेक्षक गणेश डीखळे, लेखापाल महेश नाणेकर, स्वप्नील दुर्गाडे देवसंस्थानचे कर्मचारी मंगेश चव्हाण, शिवा राणे, राहुल झगडे, नितीन कुदळे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)