जूना पुल पाडल्यानंतर नवा पूल शंभर वर्षे टिकेल याची दक्षता घ्या

हायकोर्टाची रेल्वे प्रशासनाला कोपरखळी


हॅंकॉक ब्रिज नंतर कर्नाक रेल्वे पूल ही पाडणार


रेल्वे प्रशासनाला हायकोर्टाचा हिरवा कंदील

मुंबई – दिडशे वर्षापूर्वीचा ब्रिटीश कालीन पूल जीर्ण झाल्याने तो पाडून नवा पूल बांधताना तो किमान शंभर वर्षे टिकेल याची दक्षता घ्या, अशी कोपरखळी उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला मारली. दक्षिण मुंबईतील कर्नाक रेल्वे पूल पाडण्यास रेल्वे आणि पालिका प्रशासनाला न्यायालयाने परवानगी दिली.

ब्रिटीशकालीन हॅंकॉक पूल पाडून दोन वर्षे उलटली तरी त्या जागी पर्यायी पादचारी पूल उभारण्यास विलंब होत आहे. याला बगल देऊन रेल्वे प्रशासनाने दक्षिण मुंबईतील कर्नाक रेल्वे पूल जीर्ण झाल्याचा मुद्दा पुढे केला आणि तो पाडण्याची परवानगी उच्च न्यायालयाकडून मिळली. न्या. नरेश पाटील आणि न्या. गिरीष कुलकर्णी यांनी ही परवानगी देताना “सर्वसामान्य नागरीकांना त्याचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. नव्या पुलाला विलंब लावून नका असही रेल्वे आणि पालिका प्रशासनाला बजावले.

सॅण्डहर्स्ट रोड आणि भायखळा स्थानकांदरम्यानच्या हॅंकॉक ब्रिजच्या जागी अद्यापी पादचारी पूल बांधकामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वे रुळावरून चालण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही यात अनेक निष्पाप प्रवाशांचे बळी जात आहेत, याकडे लक्ष वेधणारी जनहित याचिका ऍड. कमलाकर शेणॉय यांनी उच्च न्यायालयात दाखल आहे. त्या याचिकेवर आज सुनावणी झाली. मागील सुनावणीच्यावेळी रेल्वेच्यावतीने ऍड सुुरेश कुमार यांनी हॅंकॉक ब्रिज पादचारी पुलाला बगल देऊन कर्नाक रेल्वे पूल पाडण्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

तज्ज्ञांच्या अहवालानुसार कर्नाक रेल्वे पूल सध्या जीर्ण झाला असून त्याचा उपनगरी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जिवीताला धोका संभावतो, असे दावा त्यांनी केला होता. याची दखल घेऊन न्यायालयने यासंदर्भात पूलाची तपासणी करून अहवाल मागवला होता. तसेच हा पूल पाडण्यासाठी आणि नव्याने बांधण्याची निविदाही तयार असल्याचे न्यायालयाच्या निर्देशनास आणून दिले गेले. पूल पाडल्यानंतर दीड वर्षात तो बंधला जाईल अशी हमीही न्यायालयाला दिली होती. याची दखल घेऊन न्यायालयाने पूल पाडण्यास परवागनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)