जुन्नर महाविद्यालयातील एम. ए. आणि फंक्‍शनल इंग्रजीचा निकाल 100 टक्के

जुन्नर – जुन्नर येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील बी. ए. फंक्‍शनल इंग्रजी आणि एम. ए. इंग्रजीचा निकाल 100 टक्के लागल्याची माहिती इंग्रजी विभाग प्रमुख व प्रभारी प्राचार्य. डॉ. चंद्रकांत मंडलिक यांनी दिली.
या महाविद्यालयात पदवी स्तरावर स्पेशल फंक्‍शनल इंग्रजी, तसेच पदव्युत्तर स्तरावर स्पेशल इंग्रजीचे अध्यापन केले जाते. सलग दुसऱ्या वर्षी एम. ए. आणि फंक्‍शनल इंग्रजीचा निकाल 100 टक्के लागला आहे. इनामदार सबा आयशीन शेख- एम. ए. प्रथम वर्ष आणि ऋतुजा मोजाड – एम. ए. द्वितीय वर्षात प्रथम क्रमांक मिळविला.
ग्रामीण भागातील विद्यार्थांनी इंग्रजी विषयात विशेष प्रावीण्य प्राप्त करावे, यासाठी या विभागाद्वारे वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यात इंग्रजी निबंध स्पर्धा, इंग्रजी कथाकथन, इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा आणि इंग्रजीत साप्ताहिक चर्चा सत्र (सॅट-चॅट) यांचा समावेश होतो. विद्यार्थांनी इंग्रजीचे लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी विभागामार्फत कॉलेजीयन नावाचे त्रैमासिक इंग्रजीत चालवले जाते. त्यात विद्यार्थांनी लिहिलेल्या कथा,कविता व बातम्या प्रकाशित केल्या जातात. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आणि विभाग प्रमुख डॉ. चंद्रकांत मंडलिक, विभाग समन्वयक प्रा. सुधीर जोशी, डॉ. तुषार कांबळे, प्रा. रंजना पुराणे व प्रा. युगंधरा गिरमे यांनी विद्यार्थांनी विशेष यश संपादित करावे यासाठी प्रयत्न केले.
संस्थेचे अध्यक्ष ऍड. संजय शिवाजीराव काळे, संस्था पदाधिकारी, प्राचार्य, अध्यक्ष, प्रतिनिधी प्रा. व्ही. बी. कुलकर्णी, उपप्राचार्य व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थांचे, तसेच प्राध्यापकांचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.