जुन्नर तालुक्‍यात भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिक सज्ज

आमदार शरद सोनवणे यांचे जुन्नर येथे प्रतिपादन

जुन्नर- येत्या विधानसभेला संपूर्ण राज्यात युतीसाठी पोषक वातावरण असून, यंदा जुन्नर तालुक्‍यात भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत. गेल्या पाच वर्षांत जुन्नर तालुक्‍यात रस्त्यांसह विविध विकासकामे मोठ्या प्रमाणात झाली असून, संघटनेचे सर्व पदाधिकारी एकत्रितपणे काम करत असल्याचे आमदार शरद सोनवणे यांनी सांगितले. गुरुवारी (दि. 1) जुन्नर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

याप्रसंगी तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, सभापती ललिता चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, नगराध्यक्ष शाम पांडे, उपसभापती दिलीप डुंबरे, हिराताई चव्हाण, शरद चौधरी, संभाजी तांबे, नेताजी डोके, नगरसेवक समीर भगत, अविन फुलपगार, निकिता गोसावी, सुवर्णा बनकर, वैभव मलठणकर, रामभाऊ वाळुंज, विकी पारखे, राजेंद्र चव्हाण, महेश शेळके, निखिल गावडे, विकास राऊत, विकी गोसावी आणि तालुक्‍यातील शिवसैनिक उपस्थित होते.

तालुक्‍यात काही मंडळी दोन दगडावर हात ठेवून आहेत. त्यांना विनंती आहे की, आजची संधी उद्या नाही, त्यामुळे सर्वांनी कामाला लागा, विजय आपलाच आहे, असे आवाहन आमदार शरद सोनवणे यांनी याप्रसंगी केले. जुन्नर तालुक्‍यात विरोधी पक्षातील काही नेत्यांचे लवकरच प्रवेश लवकरच होणार असल्याची माहिती सोनवणे यांनी सांगितले.

  • “वन बूथ टेन युथ’ तालुक्‍यात राबवणार
    वन बूथ टेन युथ ही संकल्पना तालुक्‍यात राबविणार असून, कार्यकाऱ्यांचा दोन लाखांचा अपघाती विमा काढणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी दिली. जुन्नर तालुक्‍यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी गटतट बाजूला ठेवून तालुक्‍यात सेनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी एकत्रितपणे काम सुरू केल्याची माहितीही त्यांनी दिली.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.