जुन्नर तालुक्‍यात गहू काढणी शेवटच्या टप्प्यात

बेल्हे- जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागात राजुरी, बोरी बुद्रूक ,साळवाडी, जाधववाडी, शिरोली, सुलतानपूर गावांमध्ये गव्हाच्या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले आहे. सध्या हे पीक अंतिम टप्प्यात आलेले असून, या पिकाची कापणी जोरात सुरू आहे.

हॉर्वेस्टर मशीनने मळणी करण्यापेक्षा मजुरांकडून कापून ते मळणी करण्याला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. कारण हॉवरेस्टर मशीनने गहू केला, तर त्या शेतकऱ्यांचे काम लवकर होते आणि मजुरांना रोजगार मिळत नाही. मजुरांकडून गहू कापल्यास त्या शेतकऱ्यांना थोडी मेहनत जास्त करावी लागते; पण गव्हाच्या कापणी केल्यानंतर त्या गव्हाची उपनेरमध्ये मळणी केल्यावर जो भुस शिल्लक राहतो, त्या भुसाला दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
हे भूस गायींसाठी चांगल्या प्रकारचे खाद्य आहे. मात्र, हॉर्वेस्टर मशीनने गहू केल्यास भूस मिळत नाही. दुहेरी उत्पादन मिळवण्याच्या दृष्टीने शेतकरी मजुरांकडून गव्हाची कापणी करण्यास तालक्‍यात पसंती देताना दिसत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.