जुन्नर तालुक्‍याचा निकाल 91.40 टक्के

जुन्नर -तालुक्‍यातील उच्च माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता बारावीचा निकाल 91.40 टक्के इतका लागला असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ यांनी दिली. तालुक्‍यात 5,225 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 4776 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी व पालक यांची दुपारी दोननंतर सायबर कॅफेमध्ये गर्दी केल्याचे पाहण्यास मिळाले.

तालुक्‍याचा महाविद्यालय निहाय निकाल पुढीलप्रमाणे : अण्णासाहेब वाघिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय ओतूर 92.29टक्के, श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर 85.28टक्के, सद्‌गुरू सिताराम विद्यालय पिंपरी पेंढार 90.19टक्के, गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर नारायणगाव 98.56 टक्के, श्री बेल्हेश्वर महाविद्यालय बेल्हे 98.56 टक्के, ज्ञानमंदिर आळे 93.38टक्के, हिंदमाता विद्यालय वडगाव कांदळी 93.10टक्के, पंडित नेहरु विद्यालय 84.94टक्के, सावित्रीबाई फुले महाविद्यालय 94.11टक्के, विद्या विकास मंदिर राजुरी 92.20टक्के, अंजुमन हायस्कूल जुन्नर 88.57टक्के, श्री रंगदास स्वामी हायस्कूल अणे 91.52टक्के, न्यू इंग्लिश स्कूल आपटाळे 66.66टक्के, आणे-माळशेज मढ 75टक्के, शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर 90.21टक्के, अनुदानित ज्युनिअर कॉलेज तळेरान 91.95टक्के, अनुदानित आश्रमशाळा कोळवाडी 90.90टक्के, समर्थ महाविद्यालय बेल्हे 99.09टक्के, श्री पांडुरंग ज्युनिअर कॉलेज निमगाव सावा 89.65टक्के.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सात महाविद्यालये शंभर नंबरी…
एस. व्ही. ज्युनिअर महाविद्यालय पिंपळवंडी, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सोमतवाडी, सरदार पटेल हायस्कूल आणे, श्री. जे. आर. गुंजाळ इंग्लिश मेडिअम स्कूल आळेफाटा, डॉ. सी. के. ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स खानापूर, हांडे-देशमुख कॉलेज आळेफाटा, विद्यानिकेतन कॉलेज राजुरी या सात कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 100टक्के लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)