जुन्नरला पालेभाज्यांचे भाव कडाडले

  • शेतकरी मान्सून पावसाच्या प्रतिक्षेत

जुन्नर – जून महिना संपत आला तरी अद्याप मान्सून पाऊस बरसला नाही. त्यामुळे पालेभाज्यांची आवक घटली असून भाव कडाडले आहेत. तर जुन्नर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील प्रमुख पीक असलेल्या भाताच्या पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या आहेत. जुन्नरला रविवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात जवळपास सर्वच भाज्या भाव खात आहेत. मिरची 100 रुपये प्रतिकिलो, कोथिंबीर छोटी गड्डी 30, मेथी 25, पालक 15, शेपू 20 वांगी 60 रुपये प्रतिकिलो, भेंडी 60, दोडके 60, कारले 80, गवार 60, कोबी 30, श्रावणी घेवडा 120, आलं 140, लसूण 100, फ्लॉवर 50, वाटाणा 120 रुपये प्रतिकिलोने ग्राहकांना खरेदी करावा लागत आहे. जर पावसाने आणखीन ताण दिला तर हे 30 ते 70 टक्‍के झालेली भाववाढ कमी होण्याची चिन्हे नसल्याचे भाजी विक्रेते अभिजित वाघमारे यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)