जुन्नरमधील “डिसेंट’ राहण्याचा संदेश

10 हजार मुली व 6 हजार महिलांना आरोग्याबाबत मार्गदर्शन

नारायणगाव- आपण आपली प्रगती भरपूर केली पण काही मूलभूत शिक्षण आणि आपल्या शरीराची घ्यायची काळजी याविषयी ग्रामीण भागात अनेक किशोरवयीन मुली व महिला अनभिज्ञ आहेत. जुन्नर तालुक्‍यातील अशा सुमारे 10 हजार किशोरवयीन मुली आणि 6 हजार महिलांना वैयक्तिक शारीरिक स्वच्छतेबाबत आणि उत्तम आरोग्याबाबत “डिसेंट’ राहण्याचे धडे दिले जात आहे.

जुन्नर तालुक्‍यातील डिसेंट फाऊंडेशनच्या वतीने तालुक्‍यातील 22 तज्ज्ञ महिला डॉक्‍टरांची एक टीम तयार केली आहे. “कळी उमलताना’ या उपक्रमांतर्गत तालुक्‍यातील शाळा आणि महाविद्यालयांमधील किशोरवयीन मुलींना, तसेच महिलांना मासिक पाळी, तसेच स्वतःच्या शरीराची वैयक्तिक स्वच्छता याबाबत संवाद साधून मार्गदर्शन करण्यात येत आहे. अध्यक्ष महेंद्र बिडवई, उपाध्यक्ष योगेश धर्मे, सचिव अजित देशमुख, खजिनदार जितेंद्र बिडवई, प्रकल्प समन्वयक एफ. बी. अतार,समन्वयक श्रद्धा ताजने, सदस्य आदिनाथ चव्हाण, कृषितज्ज्ञ डॉ. संतोष सहाणे हे पदाधिकारी या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थिनी व महिलांच्या आरोग्यासाठी काम करत आहेत. संस्कार स्वच्छतेचा उपक्रमांतर्गत जुन्नर तालुक्‍यातील 80 शाळांना 24 प्रकारच्या वस्तू असलेले स्वछता किट देण्यात आले आहेत. डॉ.अनुष्का शिंदे, डॉ.सुनीता आवारी, डॉ.पूजा गायकवाड, डॉ. राजश्री इंगवले, डॉ. श्रद्धा भिडे, डॉ. शुभांगी वलवणकर, डॉ. कल्याणी पुंडे, डॉ. केतकी काचळे, डॉ. स्वाती घोरपडे, डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. संपदा तोडकर, डॉ. सविता फलके, डॉ. अर्चना नढे, डॉ. पल्लवी पांचाळ, डॉ. पुष्पलता शिंदे, डॉ.मुक्तांजली पोथरकर, डॉ. शीतल भोर, डॉ. पल्लवी थोरात, डॉ. सुनीता वेताळ, डॉ. हेमलता शिंदे, डॉ. रेश्‍मा घोलप, डॉ. स्वाती पवार ही महिला डॉक्‍टरांची टीम तालुक्‍यात आरोग्य स्वच्छतेबाबत जागृती करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.