जुनी सांगवीत कडकडीत बंद

सांगवी – आरक्षणासाठी सुरू असलेल्या मराठा आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी जुनी सांगवी येथील व्यावसायिकांनी “बंद’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बुधवारी जुनी सांगवी परिसरातील सर्व व्यावसायिक आस्थापने बंद ठेवण्यात आली होती. या बंद मधून शाळा, दवाखाने, मेडीकल व इतर अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या होत्या.
बुधवारी सकाळपासूनच जुनी सांगवी परिसरातील दुकाने बंद दिसत होती. थोडी दुकाने उघडी होती, त्यांनीही कार्यकर्त्यांच्या विनंतीनंतर तातडीने बंद केली. या बंद दरम्यान कोणत्याही प्रकारचा गोंधळ अथवा कोणताही अनुचित प्रकार घडली नाही.

मराठा आरक्षणच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सांगवी परिसरात सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. व्यापारी वर्गाने बंदला शंभर टक्के प्रतिसाद दिला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हौतात्म्य स्विकारणाऱ्या काकासाहेब शिंदे यांना मराठा समाज बांधव व सांगवीकर ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. काकासाहेब शिंदे अमर रहे, तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. पसायदान म्हणून श्रद्धांजली सभेची सांगता करण्यात आली. बंद काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सांगवी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
श्रद्धांजली सभेत मनोहर पवार, राजु सावळे, अतुल शितोळे, सुनिल ढोरे, शिवाजी पाडुळे, विजय साने, कुमार ढोरे, राजेंद्र काटे, चेतक शिंदे, संतोष बोरकर, धनंजय ढमढेरे, प्रदीप लाड, भूषण शिंदे, मराठा मोर्चाचे समन्वयक सचिन गवांडे, राम जाधव, अनिरूद्ध शेलार, विद्या पाटील आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)