जीवे ठार मारण्याचा प्रयत्न : तिघांना पोलीस कोठडी

पुणे – भेटण्यासाठी बोलावली व्यक्ती न आल्याने त्याच्या मित्रासह दोघांवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अलंकार पोलीसांनी तिघांना अटक केली. न्यायालयाने तिघांना 1 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे.
अनिल संदिपान कसबे (वय 23), अभिषेक विजय निवळकर (वय 26) आणि समीर वसंत मोडक (वय 30, तिघेही रा. सिंहगड रोड) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, इतर चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिलींद वसंत काटे (वय 24, रा. हिंगणे) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 26 जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली.
काटे यांचा मित्र उपेंद्र बलकवडे याला भेटण्यासाठी घेवून ये, असे अनिल कसबे याने सांगितले होते. मात्र, बलकवडे भेटण्यासाठी न गेल्याने अनिल याने त्याचे साथीदारांसह काटे आणि त्यांचा मित्र ओंकार धावडे यांच्यावर डोक्‍यात, पाठीवर, हातावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी तिघांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी फरार साथीदारांचा शोध घेण्यासाठी, गुन्ह्यातील कोयते जप्त करण्यासाठी, तिघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील
बी. आर. पाटील यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडी सुनावली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)