‘जीवन ऐसे नाव’मधून महेश कोठारेंचा जीवनप्रवास उलगडला

कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ : अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते उद्‌घाटन

कोथरूड – धडाकेबाज ते झपाटलेला, गुपचूप-गुपचूप ते थरथराट अशा एकापेक्षा एक चित्रपटातील जबरदस्त अभिनय… त्याबरोबरीने सांभाळलेली निर्मित्याची अन्‌ दिग्दर्शनाची बाजू… लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ अशा हरहुन्नरी कलाकारांसोबत जमलेली मैत्री… त्याचबरोबरीने उलघडत गेलेला महेश कोठारे यांचा अभिनय-दिग्दर्शन प्रवास याला “जीवन ऐसे नाव’ या कोथरूड सांस्कृतिक महोत्सवातील कार्यक्रमातून पुणेकरांना स्पर्शून गेला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आयडियल कॉलनी येथील मैदानावर “कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचे’ आयोजन संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. या 4 दिवसीय महोत्सवाचे उद्‌घाटन ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका मोनिका मोहोळ, निलिमा कोठारे, नगरसेवक हेमंत रासने, मंजुश्री खर्डेकर, वासंती जाधव, किरण दगडे-पाटील, अभिनेते रमेश परदेशी, अक्षय टंकसाळे, अभिनेत्री रेशम टिपणीस, बढेकर ग्रुपचे प्रवीण बढेकर, रावेतकर हौसिंगचे अमोल रावेतकर, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटीचे हर्षद झोडगे, लाकडी घानाचे आनंद पटेल उपस्थित होते. या महोत्सावाच्या निमित्ताने दिग्दर्शन आणि अभिनय क्षेत्रातील योगदानाबद्दल महेश कोठारे यांचा ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि मानपत्र देवून गौरविण्यात आले.

कार्यक्रमात ज्येष्ठ कलाकार दिलीप प्रभावळकर, पुष्कर श्रोत्री, आदिनाथ कोठारे, रेशम टिपणीस, पुष्कर जोग, सई लोकूर, सावनी रवींद्र व प्रसन्नाजीत कोसंबी आदी कलाकार सहभागी झाले. दिग्दर्शक महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील गाणी, नृत्य, यावेळी सादर करण्यात आली. तसेच पुष्कर श्रोत्री यांनी घेतलेल्या कोठारे यांच्या मुलाखतीतून कोठारे यांच्या जीवन प्रवासातील विविध पैलू प्रेक्षकांसमोर आले. यावेळी महेश कोठारे म्हणाले की, चित्रपट यशस्वी होणे हे फक्त दिग्दर्शकाच्या हाती नसून यात प्रत्येकाचेच योगदान तितकेच महत्त्वाचे असते. माझ्या या प्रवासात अनेकांनी साथ दिली म्हणूनच मी या क्षेत्रात यशस्वीपणे काम करू शकलो.

यावेळी बोलताना ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी म्हणाले की, सलग 9 वर्षे असा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करणे हे अवघड काम असून येथे अनेक आपली कलाकार आपली कला सादर करतात, हे वाखणण्याजोगे असून प्रेक्षकांचे मनोरंजन करणे ही सर्वात मोठी गोष्ट असते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुरलीधर मोहोळ यांनी केले तर, सूत्रसंचालन पुष्कर श्रोत्री यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)