जीवनावश्‍यक वस्तु जिल्हा प्रशासनाकडून केरळला रवाना

सातारा- पुरामुळे केरळ येथील बाधित झालेल्या व्यक्तींसाठी मदतीचे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत रोटरी क्‍लब, कराड व जाई सामाजिक कल्याण संस्था, कराड या संस्थांनी जीवनावश्‍यक वस्तु एकत्रित करुन त्या आज जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या उपस्थितीत केरळला पाठविण्यात आल्या.

यावेळी अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, उपजिल्हाधिकारी (महसूल) अविनाश शिंदे, तहसीलदार निलप्रसाद चव्हाण, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी सचिन जाधव, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे, भरत कांबळे, अंकुश अवघडे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यामध्ये मिनरल वॉटर, धान्य, बिस्कीट व तत्सम पदार्थ, औषधे, संसारोपयोगी भांडी यांचा समावेश आहे. या सर्व वस्तु मध्ये रेल्वे प्रशासनामार्फत केरळला पाठविण्यात येणार आहे. रोटरी क्‍लबचे अध्यक्ष डॉ. राहूल फासे व जुई सामाजिक संस्थेच्या डॉ. अनुराधा मोहिते यांनी या वस्तु मदत फेरीद्वारे विविध संस्था व देणगीदार यांच्याकडून संकलीत करुन विशेष योगदान दिले आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेले धनादेश व डी. डी. केरळ येथील मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये वर्ग करण्यात आले आहे. मध्य रेल्वे प्रशासनामार्फत वस्तु मोफत वाहतुकीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर यांनी विशेष प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)