जीवनाला अर्थपूर्ण आकार देणारे गुरु..! (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)

भारतीय संस्कृतीत गुरुला नेहमीच वंदनीय मानले जाते. त्यामुळे गुरु हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग असतो. गुरुपौर्णिमेला मानवी जीवनात महत्वाचे स्थान आहे. जगाची निर्मिती ज्या ज्ञानावर झाली, त्या ज्ञानरुपी गुरुला वंदन करण्यासाठी आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. गुरुपौर्णिमा ही सदगुरुंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु आपल्या शिष्याला नेहमी ज्ञानरुपी प्रकाश देतो. त्या ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून आपण गुरुंची प्रार्थना करतो. तो दिवस म्हणजेच गुरुपोर्णिमा होय.

मानवी जीवन गुरुंच्या ज्ञानाशिवाय क्षणभंगूर आहे. जळी, स्थळी, काष्टी, पाषानी गुरुंचे स्थान अबाधित आहे. कारण गुरुंच्या शिकवणीमुळे आपण आयुष्यातील सगळी शिखरे यशस्वीपणे पार करतो. जगाकडे बघण्याची दृष्टी ज्यांनी आपल्याला दिली. त्या गुरुंच्या अनुभवाची व ज्ञानाची उपासना आपण भक्तीभावांनी करीत असतो. संत कबीर म्हणतात त्याप्रमाणे,

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुरु गोविन्द दोऊ खड़े, काके लागूं पांय।
बलिहारी गुरु अपने गोविन्द दियो बताय।।

गुरुंनी दिलेली शिकवण उराशी बाळगून आपण ज्ञानसाधना करतो. जगाची माहिती, तंत्रज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करतो. पण माणूस म्हणून जगण्यासाठी दिलेला धडा आपण आज विसरत आहोत की काय? हा प्रश्न आज पडतो. सध्याच्या काळात सोशल मीडियाने सगळ जगचं काबीज केलं आहे. त्यामुळे पुर्वीच्या सारखी गुरुकुल पद्धत आणि गुरु-शिष्य परंपरा खंडीत झाली आहे. नव्हे आध्यात्मिक गुरुंचे सुद्धा मार्केटींग झाले आहे. संत, साधू, बाबा आणि बुवा हे राजकारणी झाले आहेत. त्यांची ढोंगीवृत्ती आणि सद्वर्तन हे समाजविघातक बनले आहे. त्यामुळे आताची पिढी ही या आधुनिक साधू-संतांना गुरु स्थानी मानत नाही. परंतु त्यांच्यासाठी गुरु असणाऱ्या आई-वडीलांपासून ते जगाकडे बघण्याची दृष्टी देणाऱ्या सर्वच गुरुंबद्दल असेलेला आदर आणि आदर्श डोळ्यासमोर ठेऊन अनेक तरुण आपले ध्येय पूर्ण करतात. संत कबीर म्हणतात त्याप्रमाणे,

गुरु बिन ज्ञान न उपजै, गुरु बिन मिलै न मोष।
गुरु बिन लखै न सत्य को गुरु बिन मिटै न दोष।।

– गंगाधर बनसोडे, पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)