जीएसटी संकलन वाढण्यासाठी प्रयत्न 

केरळला मदतीसाठी अधिभार लावण्याच्या शक्‍यतेवर विचार होणार 
नवी दिल्ली: पूरग्रस्त केरळच्या मदतीसाठी जीएसटीवर 10 टक्के अधिभार लावण्यासंबंधी केंद्र सरकारचा मंत्रिगट अभ्यास करणार आहे. जीएसटी परिषदेची बैठक काल झाली. यावेळी वाढत नसलेले जीएसटी संकलन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले.
पूरग्रस्त केरळमधील पुनर्वसनाच्या कामासाठी मोठ्या निधीची गरज आहे. ही गरज केंद्र व राज्याच्या जीएसटीवर 10 टक्के अधिभार लावून होईल का, याबाबत बैठकीत चर्चा झाली.
अधिभाराबाबत अभ्यास करण्यासाठी सात सदस्यांचा मंत्रिगट स्थापन करण्याचा निर्णय परिषदेने घेतला. हा गट परिषदेने दिलेल्या सूचनांनुसार, हा अधिभार फक्त केरळपुरता मर्यादित ठेवावा की इतर सर्व राज्यांनाही लागू असावा, तसेच ऐषोआरामाच्या सेवांवर हा अधिभार असावा की वस्तूंवर याचा अभ्यास करणार आहे.
बैठकीत अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, जीएसटीमुळे दहा राज्ये व केंद्रशासित प्रदेशात निर्माण झालेली महसुली तूट 20 ते 42 टक्‍के आहे. फक्त ईशान्येकडील सहा राज्यांत वाढीव महसूल गोळा होत आहे. जुलै 2017 ते मार्च 2018 दरम्यान राज्यांची सरासरी महसुली तूट 16 टक्‍के होती. एप्रिल ते ऑगस्ट 2018 दरम्यान ती 13 टक्‍क्‍यांवर आली आहे. त्यासाठी कर संकलन वाढण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)