जीएसटी छोट्या उद्योगांसाठी फायदेशीर 

आगामी काळात करसंकलनही वाढण्याची शक्‍यता 
मुंबई:गेल्या वर्षभरात, सरकारला जीएसटीतून 7.41 लाख कोटी रुपये महसूल मिळाला आणि चालू आर्थिक वर्षात करसंकलन 13 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक होईल, असा विश्‍वास सरकारला आहे. ही आकडेवारी साध्य करण्याच्या दिशेने आपण योग्य वाटचाल करत आहोत, असे डीसीबी बॅंकेच्या रिटेल व एसएमई बॅंकिंग विभागाचे प्रमुख प्रवीण कुट्टी यानीं सांगितले.
रोख रकमेचा ओघ व जीएसटीचे पालन या बाबतीत समस्यांना तोंड देणाऱ्या एमएसएमई दृष्टीने एक देश-एक कर अशी प्रणाली राबवणे सोपे नव्हते. तो अडचणीचा टप्पा आता मागे पडला आहे आणि उद्योग आधार मेमोरॅंडम (यूएएम) पोर्टलवर जुलै 2018 पर्यंत नोंदणी केलेल्या 48 लाख एमएसएमईंच्या जीएसटीतील योगदानामध्ये आर्थिक वर्ष 19 मध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.
17 कर व विविध सेस यांच्या ऐवजी एकच कर यामुळे कर भरण्याची प्रक्रिया सोपी व सुरळीत झाली आहे. यामुळे एमएसएमईंना व्यवसायाची वाढ व विकास या दृष्टीने मनुष्यबळाचे व अन्य संसाधनांचे योग्य नियोजन करणे शक्‍य झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
नव्या करप्रणालीने कंपन्यांना डिजिटल तंत्रज्ञान स्वीकारण्यास व व्यवसायाच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यास भाग पाडले आहे. याचा फायदा कंपन्या, तसेच पुरवठादार, व्हेंडर व ग्राहक यांना होत आहे. अकाउंटिंग प्रक्रियेतील पारदर्शकता वाढली असल्याने, प्रस्थापित संस्थांचा आर्थिक बाबतीतील सहभाग वाढल्याचे दिसून येते. आज, एमएसएमईंसाठी कर्ज घेण्याचा खर्च कमी झाला असल्याने व्यवसायाच्या चक्रामध्ये अधिक लवचिकता आली आहे, असे ते म्हणाले.
मार्चमध्ये मुख्य कामकाजाबाबत एमएसएमईंची धावपळ कमी असते आणि त्यांचा भर बुक्‍स ऑफ अकाउंट्‌सचा ताळेबंद करण्यावर व कर भरण्यावर असतो. परंतु, जीएसटीमुळे कंपन्यांना त्यांच्या अकाउंट्‌सचा नियमित मागोवा घ्यावा लागतो. याचा अर्थ, एमएसएमईंना चुका शोधता येऊ शकतात, पेमेंट जलद होण्याची दक्षता घेता येऊ शकते.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)