जीएसटी कपातीमुळे शेअरबाजारात उत्साहाला आले उधाण 

मुख्य निर्देशांकाबरोबरच स्मॉल कॅपमध्ये वाढ 
नवी दिल्ली: ब्ल्यू चीप कंपन्या चांगले ताळेबंद जाहीर करीत असतानाच जीएसटी परिषदेने 100 वस्तूवरील जीएसटी कर तब्बल 10 टक्‍क्‍यांनी कमी करून तो केवळ 18 टक्‍के केला. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारविरोधातील अविश्‍वास ठराव फेटाळला गेला. त्यातच क्रुडचे दर कमी झाल्यामुळे रुपया बराच सावरला. अमेरिका आणि युरोपियन समुदायातील व्यापारातील तणाव कमी झाल्यामुळे जागतिक शेअरबाजारातून सकारात्मक संदेश आले. आतापर्यंत परत जात असलेले परदेशी संस्थागत गुंतवणूकदार आता परतू लागले आहेत. या सर्व कारणांमुळे भारतीय शेअरबाजारात सरलेल्या आठवड्यात बरीच खरेदी झाली आणि रोज निर्देशांक नव्या विक्रमी पातळीवर गेले.
सरलेल्या आठवड्यात मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स तब्बल 840 अंकांनी म्हणजे 2.30 टक्‍क्‍यांनी झेपावून 37336 अंकावर विराजमान झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 2.44 टक्‍क्‍यांनी म्हणजे 268 अंकांनी वाढून 11278 अंकांवर बंद झाला. या आठवड्यात मोठ्या कंपन्यांबरोबच छोट्या कंपन्यांच्या शेअरची चांगली खरेदी झाल्यामुळे स्मॉल कॅप 728 अंकानी तर मिड कॅप 716 अंकानी वाढला.
या आठवड्यात परदेशी संस्थागत गुंतवणूकदार आता परतू लागले असल्याचे चित्र बाजारात निर्माण झाले आहे. क्रुडचे दर कमी होण्याची शक्‍यता असल्यामुळे व रुपयाचे मूल्य वाढत असल्यामुळे या गुंतवणूकदारांनी भारतातून काढता पाय घेण्याची भूमिका आता काही प्रमाणात तरी बदलली असल्याचे चित्र आता बाजारात निर्माण झाले आहे. या आठवड्यात या गुंतवणूकदारांनी 3109 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केली असल्याची माहिती शेअरबाजारांनी दिली.
या आठवड्यात घडलेली महत्त्वपूर्ण बाब म्हणजे अगोदर केवळ काही कंपन्याचे शेअर वाढत असल्यामुळे निर्देशांक वाढत होते. शेअरबाजारात विषम वाढीमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या आठवड्यात मात्र सर्व कंपन्यांच्या शेअरची खरेदी हाते असल्याचे दिसून आले. सेन्सेक्‍ससंबंधातील 30 पैकी 21 कंपन्याच्या शेअरचे दर वाढले. त्याचबरोबर मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये वाढ झाली. आतापर्यंत छोट्या कंपन्याचे मूल्यांकन आवश्‍यकतेपेक्षा जास्त असल्याची भावना बाजारात निर्माण झाली होती. आता गुंतवणूकदार आगामी काळात सावध राहून व्यवहार करण्याची शक्‍यता ब्रोकर्सनी व्यक्‍त केली आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)