जीएसटीत आणखी कपात होत राहणार: जेटली 

File photo..
 निवडक वस्तूंवरच 28 टक्‍के जीएसटी कायम राहील 
नवी दिल्ली: जीएसटीतून सरकारचा महसूल वाढू लागला आहे. त्यामुळे अनेक वस्तू आणि सेवांवरील करात कपात होत आहे. आणखी महसूल वाढल्यास सिमेंट, एसी आणि मोठ्या आकाराच्या जीएसटीत कपातीची शक्‍यता खुली होणार आहे. गेल्या तेरा महिन्यांत अनेक वस्तूूंवरील 29 टक्‍के कर 18 टक्‍के इतका झाला आहे. काही महिन्यानंतर याता फक्त लक्‍झरी वस्तूचा समावेश राहणार असल्याचे केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी सांगितले आहे.
जेटली सध्या आजारावर उपचार घेत आहेत. त्याच्याकडील अर्थखाते तूर्त पियुष गोयल सांभाळत आहेत. मात्र महत्त्वाच्या घडामोडीवर जेटली फेसबुकच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्‍त करीत असतात. आज त्यांनी टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, की जीएसटी अगोदर यूपीएच्या काळात बहुतांश वस्तूवर 31 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त कर होते. आता जीएसटी आल्यानंतर सुरुवातील तो कर 28 टक्‍क्‍यावर आणला गेला होता. त्यातील बहुंताश वस्तूवरील कर आता 28 टक्‍क्‍यांवरून 18 टक्‍क्‍यांवर आणला आहे. काही महिन्यातच 28 टक्‍के कर फक्त लक्‍झरी वस्तू आणि तंबाखू, मद्य यासारख्या वस्तूवरच राहणार असल्याचे त्यांनी सांगीतले. ते म्हणले की, गेल्या एक वर्षात 384 वस्तूवरील कर कमी करण्यात आला आला आहे.
फक्त वस्तूवरील जीएसटी कमी करण्यात आलेला नाही तर सेवावरील करही कमी करण्यात आला आहे. गेल्या तेरा महिन्यात तब्बल 68 सेवांवरील कर कमी करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, राज्यांना त्यांच्या जीएसटीपूर्व करसंकलनाच्या वर 14 टक्‍के महसूलाचे आश्‍वासन केंद्रकडून देण्यात आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आतापर्यंत राज्यांना 70 हजार कोटी रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे.
सिमेंट वगळता सर्व घरगुती वस्तूवरील कर आता 28 टक्‍क्‍यांवरुन 18 किंवा 12 टक्‍के करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांनी खरेदी वाढवून आनंद व्यक्‍त करण्याची ही वेळ आहे. ग्राहकांकडून खरेदी वाढल्याची चिन्हे दिसत आहे. त्यामुळे कंपन्याचा महसूल आणि नफा वाढू लागला असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात जीएसटी परिषदेने 88 वस्तूवरील कर कमी केले आहे. आता फक्‍त 35 वस्तूंवर 28 टक्‍के कर आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)