जि.प.चा आरोग्य विभाग गोरगरिबांसाठी नेहमीच तत्पर

आरोग्य सभापती माने यांचा विश्‍वास

रेडा- गोरगरीब निराधार व उपेक्षित कुटुंबातील रुग्णांवर उपचार होत नसतील तर थेट संपर्क साधावा, जिल्हा परिषद आरोग्य विभाग अशा रूग्णांना सेवा देण्यास तत्पर आहे, असे आरोग्य विभागाचे सभापती प्रविण माने यांनी सांगितले.

इंदापूर तालुक्‍यातील मौजे बेलवाडी येथील वसंत सदाशिव माने यांच्या मणक्‍यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्यांची भेट माने यांनी घेतली. यावेळी ते बोलत होते. इंदापूर तालुक्‍यातील असंख्या रूग्णांना जि.प.च्या माध्यामातून सभापती माने यांच्या सहकार्यातून सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याने उपेक्षित व गोरगरीब कुटुंबातील रुग्णांना मदतीचा हात देणारे सभापती माने हे आरोग्य दूत म्हणून ओळखले जातात.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी सलग्न कामे जिल्ह्यातील तळागळा पर्यंत पोहचविणारे कार्यक्षम सभापती म्हणुनही त्यांचा उल्लेख केला जातो. रूग्णाला सेवा उपलब्ध करून दिल्यानंतर त्याच्याशी असलेला संवाद हे माने यांच्या कामाचे वैशिष्ठ्य मानले जात आहे. याच पार्श्‍वभुमीवर त्यांनी बेलवाडी गावात जाऊन रूग्ण वसंत माने यांच्या घरी जावून भेट घेतली. यावेळी छत्रपती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कांतीलाल जामदार, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष ऍड.शुभम निंबाळकर, सरपंच माणिक जामदार, उपसरपंच नानासाहेब पवार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)