जिल्ह्यात 35 बाधितांचा मृत्यू

करोनाबळींच्या वाढत्या संख्येने धडकी; भयावह परिस्थिती

सातारा – अपुऱ्या आरोग्य सुविधा, आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळाची कमतरता असल्याने सातारा जिल्ह्यात करोनाच्या गंभीर रुग्णांना ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटर बेडस्‌ मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे करोनाबळींची संख्या झपाट्याने वाढत आहे. आणखी 35 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. या भयावह परिस्थितीमुळे जिल्हावासीयांना धडकी भरली आहे. 

सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना साकुर्डी, ता. कराड येथील 72 वर्षीय पुरुष, व्यंकटपुरा पेठ, सातारा येथील 64 वर्षीय पुरुष, रहिमतपूर, ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय पुरुष, नित्रळ, ता. सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, अतीत, ता. सातारा येथील 86 वर्षीय पुरुष, नुने, ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, सदरबझार, सातारा येथील 58 वर्षीय पुरुष, पंताचा गोट, सातारा येथील 84 वर्षीय महिला, शाहूपुरी, सातारा येथील 76 वर्षीय पुरुष, सासुर्वे, ता. कोरेगाव येथील 53 वर्षीय महिला,

शनिवार पेठ, सातारा येथील 43 वर्षीय महिला, मेढा, ता. जावळी येथील 75 वर्षीय पुरुष, करंजे, सातारा येथील 69 वर्षीय पुरुष, शेंदुरजणे, ता. कोरेगाव येथील 88 वर्षीय पुरुष, चाफळ, ता. पाटण येथील 71 वर्षीय पुरुष, कुमठे, ता. खटाव येथील 63 वर्षीय महिला. जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना औंध, ता. खटाव येथील 67 वर्षीय महिला, विडणी, ता. फलटण येथील 48 वर्षीय महिला, शाहूपुरी, सातारा येथील 69 वर्षीय पुरुष, धनकवडी, पुणे येथील 74 वर्षीय महिला, कोरेगावातील 72 व 75 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, म्हसवड, ता. माण येथील 60 व 72 वर्षीय महिला, 82 वर्षीय पुरुष, माण तालुक्‍यातील 75 वर्षीय महिला,

पळशी, ता. माण येथील 77 वर्षीय महिला, कडेगाव, जि. सांगली येथील 51 वर्षीय पुरुष, भरतगाव, ता. सातारा येथील 85 वर्षीय पुरुष, नावडी, ता. पाटण येथील 82 वर्षीय पुरुष, कराडमधील 70 वर्षीय पुरुष, शाहूनगर, सातारा येथील 55 वर्षीय पुरुष, कुडाळ, ता. जावळी येथील 73 वर्षीय पुरुष, हुमगाव, ता. जावळी येथील 80 वर्षीय पुरुष, अशा 35 बाधितांचा मृत्यू झाल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.