जिल्ह्यात प्रथमच मोफत पोलीस भरती मार्गदर्शन शिबिर

विजयसिंह पिसाळ युवा मंचच्यावतीने आयोजन
वाई, दि. 29 (प्रतिनिधी) – महाराष्ट्रात लवकरच होणाऱ्या मोठ्या पोलीस भरतीसाठी सह्याद्री करिअर ऍकॅडमी, बारामती आणि विजयसिंह पिसाळ युवामंच वाई यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्ह्यात पहिल्यांदाच मोफत पोलीस भरती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक ऍड. विजयसिंह पिसाळ यांनी दिली.
पोलीस भरती पूर्व मार्गदर्शक मेळावा शनिवार, दि. 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता शेतकरी बहुउद्देशीय हॉल बाजार समिती वाई या ठिकाणी घेण्यात येणार आहे. या शिबिराचे उद्‌घाटन खा.उदयनराजे भोसले यांच्या हस्ते आणि आ. मकरंद पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख, सहायुक्त डी. एम. फडतरे, वाईचे उपनगराध्यक्ष अनिल सावंत, उपविभागीय अधिकारी अजित टिके, पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या मेळाव्यासाठी बारामती येथील प्रसिद्ध सह्याद्री करिअर ऍकॅडमीचे संचालक आणि “पोलीस भरती’ या पुस्तकाचे लेखक उमेश रुपनवर आणि इतर तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत.
या मार्गदर्शन मेळाव्यात पोलीस भरतीसाठी लागणारी व बदललेली कागदपत्रे, इच्छुकांनी निश्‍चित भरती होण्यासाठी अचूक जिल्हा कसा आणि कोणता निवडावा? पोलीस भरतीसाठी शासनाचे नवीन अध्यादेश (जी.आर.) मैदानी चाचणी, लेखी परीक्षा आदी प्रत्येक घटकातील बारकावे व बदल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. उमेदवारांनी मैदानी चाचणी व लेखी परीक्षेत 90 पेक्षा जास्त गुण कसे मिळवावेत याबाबतचे सखोल मार्गदर्शन या मेळाव्यात केले जाणार आहे. एकंदरीत बदलणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेला सामोरे जाताना हमखास यशस्वी कसे व्हावे याचा कानमंत्रच या कार्यशाळेत दिला जाणार आहे. तसेच सह्याद्री ऍकॅडमीची पोलीस भरती विषयक पुस्तके 40 टक्के सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार आहेत.
पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगलेल्या इच्छुक उमेदवारांनी या मोफत पोलीस भरती मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन ऍड. विजयसिंह पिसाळ यांनी व मंचच्या पदाधिकारी,सदस्यांनी केले आहे.

आपल्या भागातील तरुणांना पोलीस भरतीसाठी योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी युवा मंचच्या माध्यमातून आम्ही या मोफत शिबिराचे आयोजन केले असून लवकरच पोलीस भरती साठी निवासी प्रशिक्षण शिबीर घेऊन आपल्या भागातील तरुणांचा पोलीस भरतीतील टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
-ऍड. विजयसिंह पिसाळ, संयोजक

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)