जिल्ह्यातील 71 पोलिस अधिकारी बदलीच्या मार्गावर 

प्रशांत जाधव 

सातारा,दि.28

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हा पोलिस दलात जिल्हाअंतर्गत सुरू असलेल्या बदल्या संपतात न संपतात तोपर्यंत जिल्ह्याबाहेर बदल्यांसाठी सात पोलिस निरीक्षकांना तसेच पोलिस उपनिरीक्षकांना कार्यकाल पुर्ण झाल्याने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाकडून बदल्यांचे अर्ज मागवण्यात आले आहेत.

आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रीक निवडणुकांदरम्यान जिल्ह्यातील अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याचे संकेत पोलिस दलातील वरिष्ठ सुत्रांनी दिले होते. नुकतीच सातारा शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांची पुणे ग्रामीणला बदली झाली. त्यानंतर जिल्ह्यातील सात पोलिस निरीक्षकांना बदलीसाठी पोलिस महानिरीक्षक कार्यालयाकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

ज्या पोलिस अधिकाऱ्यांचा कार्यकाळ सातारा जिल्ह्यात 31 मे पर्यंत तीन ते चार वर्षाहून अधिक झाला आहे. अशा अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार अर्ज मागवण्यात आले आहेत.

अर्ज मागवलेल्या अधिकाऱ्यांत डी.जी. नाळे,आण्णासाहेब मांजरे,चंद्रकांत बेदरे,यशवंत शिर्के, विनायक वेताळ, प्रकाश सावंत, जे.एम. गुंजवटे, विकास धस हे पोलिस निरीक्षक तर एस.एन.घाडगे,पुष्पा किर्दत,मालोजी देशमुख,सुनिल जाधव,बी.एन.बुरसे,एच.आर.गायकवाड, बाळासाहेव भरणे, डी.टी.जौंजाळ, स्वप्नील लोखंडे, वृषाली पाटील, ए.बी.जाधव, विकास जाधव, सोमनाथ लांडे, हणमंत कंकडकी हे सहाय्यक पोलिस निरीक्षक तसेच चेतन मच्छले,विजया वंजारी, एम.के.कदम, डी. आर. साळी, डी.आर.अतिग्रे, पी.के. राठोड, एस.व्ही. खाडे, मुरलीधर आवळे, एलसीबीचे प्रसन्न जऱ्हाड या पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली सत्रामुळे आगामी निवडणुकांच्या तोंडावर पोलिस दलात मोठी उलथापालथ होण्याची शक्‍यता आहे.

यापुर्वी निवडणुक काळात प्रभारी म्हणून काम केलेल्या तसेच 31 मे पर्यंत कार्यकाल पुर्ण झालेल्या जिल्ह्यातील सर्वच अधिकाऱ्यांना नव्या बदलीला सामोरे जावे लागणार आहे.

———————————————————-

विनंती बदलीचा आकडाही मोठा
आगामी काळात होणाऱ्या प्रशासकीय बदल्यांबरोबरच आता जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक,सहाय्यक पोलिस निरीक्षक,उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी विनंती बदलीसाठी विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाकडे अर्ज केले आहेत. यामध्ये सात पोलिस निरीक्षक,सहा सहाय्यक पोलिस निरीक्षक,तीन पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.
———————————————————-
स्वग्राम’मुळे 34 अधिकारी जिल्ह्याबाहेर
निवडणूक आयोगाच्या तसेच पोलिस दलाच्या नियमावलीनुसार ज्या पोलिस अधिकाऱ्यांचा मुळ जिल्हा सातारा असुनही ते या जिल्ह्यात नोकरी करत आहेत. त्या अधिकाऱ्यांना स्वग्राम’च्या नियमावलीनुसार बदलीला सामोरे जावे लागणार आहे. यामध्ये एक पोलिस निरीक्षक, पाच सहाय्यक पोलिस निरीक्षक, अठ्ठावीस पोलिस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)