जिल्हा बॅंकेच्या 52 हजार एटीएम कार्ड ब्लॉक

इव्हीएम कार्ड न घेतल्याने ग्राहकांना बसला फटका : पैसे काढण्यासाठी बॅंकेत गर्दी

सोमेश्‍वरनगर- रिझर्व्ह बॅंकेच्या नवीन नियमानुसार पुणे जिल्हा बॅंकेने पुणे जिल्ह्यातील 283 शाखांमधील 51 हजार 800 एटीएम कार्ड अचानक “ब्लॉक’ केल्याने एटीएम धारकांची तारांबळ उडाली असून पैसे काढण्यासाठी बॅंकांमध्ये ग्राहकांची गर्दी होत आहे.
जिल्हाने बॅंकेने यापूर्वीच जुनी मग्नेटिक स्ट्रिप्स असलेली कार्ड बॅंकेत जमा करून नवीन इव्हीएम कार्ड घेऊन जाण्याचे आव्हान करण्यात आले होते. मात्र, ज्या जुन्या एटीएमधारकांनी जुनी कार्ड जमा करून नवीन कार्ड घेतली नाहीत अशा एटीएम धारकांची कार्ड आज (बुधवारी) बॅंकेने अचानक “ब्लॉक’ केल्याने या खातेदारांना बॅंकेकडे धाव घेतली आहे. आता या खातेदारांना जुनी कार्ड जमा करून नवीन कार्डसाठी अर्ज भरून द्यावा लागणार आहे. काही दिवसातच या खातेदारांना ईव्हीएम स्ट्रिप्स असलेली नवीन एटीएम कार्ड मिळणार आहेत. त्यामुळे ज्या खातेदारांची कार्ड ब्लॉक झालेली आहेत अशा खातेदारांनी पैसे काढण्यासाठी आज बॅंकांमध्ये गर्दी केली होती.

  • रिझर्व्ह बॅंकेच्या नवीन नियमानुसार मग्नेटिक स्ट्रिप्स असलेली कार्ड ट्रोल होऊ शकतात म्हणून 31 डिसेंबर 2018 नंतर ही कार्ड बंद करण्याच्या सूचना रिझर्व्ह बॅंकेने दिल्या होत्या, त्यानुसार जिल्हा बॅंकेने जिल्ह्यातील सर्व 283 शाखांना याबाबत सूचना देऊन याबाबत खातेदारांना संदेशा (मेसेज)द्वारे कळविण्यात आले होते. तरी ग्राहकांनी लक्ष न दिल्याने त्यांचे कार्ड ब्लॉक केल्या आहेत. तरी गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी आपल्या बॅंकेच्या शाखेत इव्हीएम एटीएम कार्डसाठी अर्ज करावेत.
    – रमेश थोरात, अध्यक्ष, जिल्हा बॅंक, पुणे 

Leave A Reply

Your email address will not be published.