जिल्हा परिषद शाळेत मोफत शुद्ध पाणीपुरवठा

तळेगाव ढमढेरे- येथील कुमार जयसिंगराव ढमढेरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना 200लिटर फिल्टरचे पाणी मोफत देण्याचे काम प्रभाकर ढमढेरे यांच्यामार्फत देण्याची सोय केली. या उपक्रमाचे शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. सध्या पाण्यामुळे अनेक आजार होतात. विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे आणि त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे म्हणून एक सामाजिक उपक्रम तळेगाव ढमढेरे येथील उद्योजक प्रभाकर ढमढेरे यांनी कुमार जयसिंगराव ढमढेरे प्राथमिक विद्यालय 1 व 2 शाळेतील मुला-मुलींसाठी मोफत पाणी देण्याचे ठरवले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जालिंदर आदक, मुख्याध्यापक संभाजी कांबळे,मुख्याध्यापक अशोक राऊत, सुधीर ढमढेरे, संतोष ढमढेरे, संतोष नरके, बाळासाहेब कऱ्हेकर, मारुती रासकर, ग्रामस्थ, महिला, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.