जिल्हा परिषद शाळेचा रौप्यमहोत्सव उत्साहात

परिंचे- परिंचे (ता. पुरंदर) येथील घारमळकरवाडी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचा रौप्यमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप यादव यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंतकुमार माहुरकर, पंचायत समितीच्या सदस्या अर्चना जाधव, सरपंच समीर जाधव, माजी सरपंच सुनील शिंदे, केंद्र प्रमुख राजेंद्र कुंजीर, सुरेश मोरे, पी. एस. जाधव, संभाजी नवले, बाळासाहेब जाधव, उल्हास जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब राऊत, ग्रामपंचायत सदस्या हिना नवले, सुप्रिया जाधव, गायत्री जाधव, मुख्याध्यापिका मधुबाला कोल्हे व जयश्री उबाळे आदी उपस्थित होते. यावेळी दिलीप यादव यांनी शाळेतील उपक्रमांचे कौतुक करुन जिल्हा परिषदेच्या वतीने भौतिक सुविधा दुरुस्ती योजने अंतर्गत अनुदान देण्यात येणार असल्याचे सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)