जिल्हा परिषद ते शासकीय विश्रामगृह मार्गावरील अतिक्रमण हटवली

सातारा, दि. 26 (प्रतिनिधी) –
सातारा पालिकेच्या शहर विकास विभागाच्या वतीने जिल्हा परिषद ते शासकीय विश्रामगृह मार्गावरील टपऱ्यांची अतिक्रमणे गुरूवारी हटवण्यात आली. या कारवाईत पालिकेचे अकरा कर्मचारी सहभागी झाले होते. काही टपरी चालकांनी विरोध केल्याने अडचणं झाली होती, मात्र तात्काळ पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला. सकाळी सव्वाबारा ते सव्वातीन या तीन तासाच्या धडक मोहिमेत आठ खोकी हटवण्यात आली. व दोन खोकी जप्त करण्यात आली. या खोक यांना एक हजार रूपये दंड करून त्याची रवानगी हुतात्मा उद्यानात करण्यात आली. अतिक्रमण निरीक्षक शैलेश अष्टेकर व प्रशांत निकम आणि त्यांच्यासह दहा कर्मचारी व एक वाहनचालक असे अकरा जणांचे पथक जिल्हा परिषद कॉर्नरला रवाना झाले. सदर बझार जरंडेश्वर नाक्‍याला जाणारा हा सोयीचा मार्ग असून या मार्गावर टपऱ्यांची अतिक्रमणे वाढल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे तीन तासाच्या पालिकेच्या धडक मोहिमत टपऱ्यांची अतिक्रमणे हटवून रस्ता साफ करण्यात आला. काही टपरी चालकांचा कारवाईला विरोध झाला मात्र या मोहिमेला तात्काळ पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला. काही टपऱ्या तडक कारवाई करून हुतात्मा उद्यानाला रवाना झाल्या. शुक्रवारी अनंत इंग्लिश स्कूल मार्गावरील अतिक्रमणे काढण्यात येणार असल्याचे प्रशांत निकम यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)