जिल्हा नेटबॉल स्पर्धेत विद्यानंदच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

निगडी – पुणे जिल्हा परिषद आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या विद्यमाने जिल्हा नेटबॉल स्पर्धेत विद्यानंद भवनच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. स्पर्धा सेंट ऊर्सूला हायस्कूलच्या मैदानावर झाल्या. 14 वर्षांखालील मुलांच्या गटात अंतीम सामना “विद्यानंद’ च्याच प्राथमिक व माध्यमिकमध्ये झाला. प्राथमिक विभागाने हा सामना 7-6 असा जिंकून पहिले स्थान पटकावले. भुमिक पटेलने 5, तर निर्भय सावंतने 2 गोल केले. माध्यमिक विभागाच्या संघाने द्वितीय स्थान मिळवले. 17 वर्षे मुले गटात विद्यानंद भवनने द्वितीय क्रमांक पटकावला. साहिल वाघमोडेने 7, तर यशोधन कुलकर्णी ने 4 गोल नोंदवले. 17 वर्षे मुलींच्या संघाला तृतीय क्रमांक मिळाला. या चारही संघांना क्रीडाशिक्षक शीतल म्हात्रे, साहेबराव जाधव यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्ष भरत चव्हाण-पाटील, संस्था विश्वस्त डॉ. जयसिंग पाटील, डॉ. डी. आर. करनुरे सर, मुख्याध्यापिका छाया हब्बू, सविता किरंगे यांनी सर्वांचे कौतुक केले. इतर वैयक्‍तीक खेळामध्येही विद्यानंद भवन हायस्कूल उत्तम यश मिळवत आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालकांमध्ये खूप आनंदाचे वातावरण आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)