जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवरात महिला चढली टॉवरवर

पुणे,दि.29- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या मोबाईल टॉवरवर आज सकाळी एक महिला आत्महत्या करण्यासाठी चढली होती . मात्र अग्निशमन दलाचे जवान व पोलिसांनी तिची सुटका केली.
सोनूबाई येवले (39 मुळ रा. चंद्रपूर) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. या महिलेचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या समाज कल्याण कार्यालयात काम पेंडीग आहे. मागील सात वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही काम होत नसल्याने आज सकाळी त्तीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील मोबाईल टॉवरवर चढून आत्महत्या करण्याची धमकी दिली. यामुळे तातडीने घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही महिला ऐकण्यास तयार नसल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या तीन जवानांनी तिला सुखरूप खाली उतरविले. हे नाट्य जवळपास अर्धा ते पाऊण तास सुरु होते. यामुळे तेथे बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. अग्निशामक दलाचे तांडेल विजय चौरे, चालक श्रीसुंदर, फायरमन सोनावळे, ढाणकर, ठोंबरे व देवदूतचे कोकरे, गाडे, गोगार्डे आणी रुपनर यांनी प्रयत्न करुन महिलेला टॉवरवरुन खाली उतरण्यास भाग पाडले. यानंतर महिलेला बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)