जिल्हाधिकारी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

वहागाव येथील हल्लेखोरांना मोक्का लावण्याची मागणी
सातारा, दि. 30(प्रतिनिधी)- वहागाव, ता. कराड येथे महसूल कर्मचाऱ्यांना वाळू माफियांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ व हल्लेखोरांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात यावी मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले.
सोमवारी घडलेल्या घटनेची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचताच कर्मचारी संघटना प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच यावेळी आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. तसेच अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पथकामध्ये महसूल कर्मचाऱ्यांचा समावेश करू नये. या पूर्वी ही अशाच प्रकारे खटाव व माण तालुक्‍यात वाळूमाफियांकडून कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले असून आता प्रमाण वाढत असल्याने आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाई करून जरब बसवावी अशी मागणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद उगले यांनी यावेळी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)