जिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई

गुरुनाथ जाधव-
सातारा, दि. 23 – जिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई करणार असल्याची माहिती अन्न औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त सातारा शिवकुमार कोडगिरे यांनी दिली आहे.
प्रजासत्ताक दिन असो वा स्वातंत्र्यदिन या निमित्ताने सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावरती जिलेबी विक्रीचे स्टॉल सर्वत्र पहायला मिळतात. जिलेबी तयार केल्यानंतर ती उघड्यावरती ठेवू नये. शंभर पी. पी. एम. पेक्षा अधिक रंग जिलेबी तयार करण्याकरता वापरू नये. यासोबत रस्त्यावरती कोणतेही अन्नपदार्थ विक्रीकरण्यासाठी अन्न सुरक्षा मानदे शेड्युल 4 चे पालन करताना (31-1) नुसार त्यांचा परवाना घेणे व (31-2) नुसार नोंदणी करणे बंधनकारक आहे. यासाठी विक्रेत्यांनी एफ. एस. एस. ऐ. आय च्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सातारा जिल्ह्यात जिलेबी सोबतच इतर अन्न पदार्थ रसत्यावर विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी परवाने न घेता व नोंदणी न करता अन्न पदार्थाची विक्री केल्यास अन्न सुरक्षा मानदानुसार त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा शिवकुमार कोडगिरे यांनी दिला आहे.

प्रजासत्ताक व स्वातंत्र्यदिनाचा आनंद साजूक तुपातील, केशर व मावा, स्वरूपातील गोड जिलेबीचा आस्वाद घेवून आनंद द्विगुणित करण्याची पूर्वी पासूनची परंपरा सातारकरांनी आजही जपली आहे. साताऱ्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर जिलेबी तयार करून त्याची विक्री केली जाते. या कालावधीत जिलेबीच्या विक्रीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. साताऱ्यात विविध चौक, परिसरात उपनगरापर्यंत सर्वत्र जिलेबीसाठी खास स्टॉल उभारले जातात. आदल्यादिवशीच्या रात्रीपासुनच जिलेबी बनवण्याच्या कामाला सुरूवात केली जाते. यासाठी मांडव, स्टॉलची बांधणी होते. अगदी पहाटेपासून जिलेबी करण्यास सुरवात होते. आणि ती दिवसभर चालते. ग्राहकांना गरम-गरम जिलेबी मिळावी, यासाठी सर्वच मिठाई विक्रेते सजग असतात. जिल्ह्यतील छोट्या- मोठ्या गावांतील हलवाई देखील प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्यदिनास मोठ्या प्रमाणावर जिलेबी तयार करत असल्याचे पहायला मिळते. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा अन्न व औषध प्रशासन सज्ज झाले आहे. अन्नसुरक्षा रक्षकाच्या मानदानुसार रस्त्यावरती विनापरवाना अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई होणार. यामुळे रस्त्यावरती अन्न पदार्थ विक्री करणाऱ्यांनी तातडीने आपले परवाने काढावेत. रितसर नोंदणी करावी तसेच ज्यांनी याआधी नोंदणी परवाने काढले असतील त्यांनी देखील कालमर्यादा संपली आहे का ते तपासावे अन्यथा कारवाई होणारच असा इशाराच रस्त्यावरती अन्न पदार्थ विक्री करणाऱ्यांना अन्न औषध प्रशासनाने दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)