जावलीत आज मराठा क्रांतीचा भव्य दांडू महामोर्चा

कुडाळ ः महामोर्चात सहभागी झाालेले मराठा बांधव.

कुडाळ, दि. 25 (प्रतिनिधी) – मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यात शासन वेळकाढूपणा घेत असल्याच्या निषेधार्थ राजधानी छत्रपतींच्या पराक्रमाची निशाणी असणाऱ्या जावळी तालुक्‍यात मराठा क्रांती मोर्चा जावळी समन्वय समितीने गुरुवार, 26 रोजी सकाळी 10 वाजता सगळ्यांनी जमुन संपूर्ण जावळी तालुका बंद ठेवण्याची हाक कुडाळ येथे येथे आज दिली आहे. आज कुडाळमध्ये झालेल्या जावळीतील शेकडो युवक गयुवती मराठा बांधव यांच्या तोबा गर्दीच्या साक्षीने जावळीत ऐतिहासिक दांडु हातात घेऊन मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी सकाळी कुडाळ वरून मेढा तहसील कार्यालयावर प्रत्येकी अडीच फुटी दांडू घेऊन महामोर्चा ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय जावळी समितीने जाहीर केला.
मराठा आरक्षणासाठी औरंगाबाद येथे काकासाहेब शिंदे या युवकाने जलसमाधी घेतल्यानंतर राज्यभरातील वातावरण संतप्त झाले. औरंगाबादेतून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्यानुसार सातारा पाठोपाठ गुरुवारी अखंड जावळी बंद पुकारण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)