जावलीतील 46 गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी 14 कोटी निधी

आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुरवठ्याला यश; मतदारसंघ टंचाईमुक्‍त करणार
सातारा – संपुर्ण महाराष्ट्रात रोल मॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा- जावली विधानसभा मतदासंघाचा चौफेर विकास साधणाऱ्या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यामुळे साताऱ्यासह जावली तालुक्‍यातील सर्वच गावे टंचाईमुक्‍त होणार आहेत. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या कल्पक प्रयत्नांतून सातारा तालुक्‍यातील 20 आणि जावली तालुक्‍यातील 26 अशा एकूण 46 गावांना राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्नित करण्यासाठी 14 कोटी 61 लाख 79 हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या भरीव निधीमुळे या 46 गावांचा पाणीप्रश्‍न कायमस्वरुपी निकाली निघणार असून सातारा-जावली तालुका पाणीटंचाईमुक्‍त करु, असा विश्‍वास आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी या निमीत्ताने व्यक्‍त केला आहे.

सातारा-जावली मतदारसंघातील प्रत्येक गावाचा सर्वांगिण विकास साधताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी रस्त्यांचे जाळे निर्माण करतानाच प्रत्येक गावातील पाणीसमस्या सोडवण्यासाठीही प्राधान्य दिल आहे. त्यामुळेच सातारा तालुक्‍यातील 20 गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 6 कोटी 84 लाख 59 हजार आणि जावलीतील 26 गावांना नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी 7 कोटी 77 लाख 20 हजार रुपये असा भरीव निधी उपलब्ध झाला आहे. सातारा तालुक्‍यातील आगुंडेवाडी (25 लाख), आंबळे रायघर (25 लाख), आसनगाव (60 लाख), धनगरवाडी (चिखली) 30 लाख, दरे बु. (50 लाख), बेबलेवाडी (इंगळेवाडी) 50 लाख, कळंबे (30 लाख), कण्हेर (50 लाख), खडगाव (5 लाख), कोंडानी- नरेवाडी (25 लाख), कुशी (25 लाख), लिंब येथील मागासवस्ती (7.81 लाख), माळ्याचीवाडी (25 लाख), नेले (34 लाख), पिंपळवाडी (14.51 लाख), राजापुरी (33 लाख), शेंद्रे (80.20 लाख), वळसे (70 लाख), वेणेखोल (15 लाख) आणि वाघवाडी (30) लाख या गावांना नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जावली तालुक्‍यातील आलेवाडी (33.96 लाख), अंधारी (20 लाख), आपटी (30 लाख), आर्डे (26 लाख), भालेघर (15.59 लाख), बिभवी (45 लाख), बिभवी येथील बौध्दवस्ती (12 लाख), डांगरेघर (35 लाख), गाढवली (12 लाख), काळोशी (13 लाख), कसबे बामणोली (30 लाख), कावडी (20 लाख), केळघर तर्फ मेढा (35 लाख), कोळेवाडी (35 लाख), कोळघर (10.50 लाख), कुडाळ (1 कोटी 40 लाख), सावंतवाडी (कुडाळ) 14.48 लाख, कुसुंबी (45 लाख), मामुर्डी (25 लाख), मोरावळे (40 लाख), वाटंबे (मुकवली) 15 लाख, धनगरवाडी (नरफदेव) 4.77 लाख, ओझरे (60 लाख), पुनवडी (20 लाख), रुईघर (31.59 लाख) आणि सह्याद्रीनग (मेढा) या गावाच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 8.31 लाख रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे.

मतदारसंघातील तब्बल 46 गावांच्या नवीन पाणीपुरवठा योजनांसाठी भरीव निधी उपलब्ध झाल्याने त्या- त्या गावातील पाणीप्रश्‍न कायमचा निकाली निघणार आहे. यामुळे संपुर्ण मतदारसंघात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, निविदा प्रक्रीया आणि इतर शासकीय सोपस्कार तातडीने पुर्ण करुन या मंजूर गावांच्या पाणीपुरवठा योजनांचे काम लवकर सुरु करावे आणि काम दर्जेदार करुन वेळेत पुर्ण करावे, अशा सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)