जावलीतील सहा गावांचा मतदानावर बहिष्कार

कुडाळ – जावली तालुक्‍यातील डोंगरी विभागातील सहा गावांनी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून जावळी तालुक्‍यातील डोंगरी विभागात वास्तव्यास असणाऱ्या अत्यंत दुर्गम आणि डोंगरमाथ्यावर असणाऱ्या कुंभार, गणी मरडमुरे, हिरवे वस्ती, रेंडी मुरा, शेडगेवाडी, ढेबेवाडी, पदुमले, मूरे, गावातील तब्बल पाच हजारपेक्षा अधिक नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. सोमवारी जावळी तालुक्‍यातील तहसीलदारांना यासंबंधीचे निवेदन देऊन शासनाच्या विरोधात निषेध व्यक्त केला.

जावली तालुक्‍यातील डोंगरी विभागातील गावे आज देखील मूलभूत, नागरी सुविधापासून वंचित आहेत. आज ही या भागातील गावांना कधीही रस्ता सुरळीत उपलब्ध झाला नाही, आरोग्य केंद्र, पाणी सुविधा, वीज, शाळा यासारख्या मूलभूत सुविधा व नागरी सुविधांपासून वंचित असल्याच्या तक्रारी येथील नागरिकांनी व्यक्त केल्या. त्यामुळे या नागरी सुविधा जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत मतदान करणार नसल्याचा इशाराही येथील ग्रामस्थांनी दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आजही येथील विद्यार्थ्यांना वीस ते बावीस किलोमीटर अंतर पार करून शिक्षणासाठी जावे लागते. गावात प्राथमिक शाळेचे शिक्षण उपलब्ध आहे मात्र शाळांमध्ये कायमस्वरूपी शिक्षकांची कमतरता माथी मारली जात आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजना नाहीत. यामुळे नागरिकांना रोगराईला सामोरे जावे लागते. पाण्याअभावी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलोमैल पायपीट करावी लागते. त्यामुळे या गावातील विकास गेल्या अनेक वर्षापासून रखडला आहे. अशा अनेक समस्येच्या मागण्यासंबंधी नागरिकांनी सोमवारी जावळी तालुका तहसील कार्यालयावर तहसीलदारांना निवेदन देत आपल्या व्यथा मांडल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)