जालियनवाला बाग हत्याकांडांने १२ वर्षीय मुलाला बनविले क्रांतिकारी 

इंग्रजांची झोप उडवणारे आणि इंग्रजांना मुळापासून हादरवून टाकणारे क्रांतिकारी सूर्य शहिद भगतसिंग यांची आज  १११ वी जयंती आहे. देशाला स्वातंत्र्य करण्याचे स्वप्न मनात बाळगणाऱ्या भगत सिंग यांचा जन्म २८ सप्टेंबर १९०७ रोजी तत्कालीन पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्यातील बंगा गावात झाला. घरातील सदस्य स्वातंत्र्यलढयात सक्रिय असल्याने स्वातंत्र्याचे धडे त्यानं लहानपणीच मिळाले होते. परंतु, या क्रांतिकारी पर्वाला सुरुवात झाली ती जालियनवाला बाग हत्याकांड या घटनेने.

१३ एप्रिल १९९९ रोजी पंजाबच्या सुवर्णमंदिर नजीक जालियनवाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्ताने हजारो शीख बांधव जमले होते. याठिकाणी रौलेत कायद्याविरुद्ध सभाही होणार होती.परंतु, इंग्रज अधिकारी जनरल डायरने अचानकपणे जमावावर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. लोकांनी आपले प्राण वाचवण्यासाठी मार्ग दिसेल तसे धावण्यास सुरुवात केली. तर काहींनी तिथेच असणाऱ्या एका विहरीत उड्या घेतल्या. या विहिरीला आज शहिद विहीर असे नाव आहे. या घटनेलाही १३ एप्रिल रोजी ९९ वर्ष पूर्ण झाले. परंतु, जालियनवाला बाग हत्याकांडावेळी भगत सिंगही तेथेच उपस्थित होते.
केवळ १२ वर्षांच्या भगतसिंग यांनी इंग्रजांच्या क्रूरतेची परिसीमा उघड्या डोळ्यांनी बघितली. व स्वातंत्र्याची खूनगाठ मनाशी पक्की बांधली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या घटनेचा त्यांच्या मनावर एवढा खोलवर परिणाम झाला कि, त्यांनी कॉलेज सोडून ‘नौजवान भारत सभे’ची स्थापना केली. १९२८ रोजी हिंदुस्थान सोशलिस्ट पार्टी जॉईन केली. यावेळी सायमन कमिशनचा विरोध करण्यासाठी भगतसिंग, लाला लजपत राय यांच्या सह सायमन वापस जाओ च्या घोषणा दिल्या. यावेळी त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. यामध्ये लाला लजपत राय गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. यामुळे हिंदुस्थान सोशलिस्ट पार्टीला मोठा झटका बसला.

हिंदुस्थान सोशलिस्ट पार्टीने बदला घेण्याचे ठरविले व इंग्रज अधिकारी स्कॉटला मारण्याचा कट आखला. परंतु, सहायक पोलीस अधिकाऱ्याला मारले गेले. यानंतर इंग्रजअधिकाऱ्यांच्या तावडीतून वाचण्यासाठी दाढी, मिशी कापणे शीख समुदायाच्या विरुद्ध असूनही त्यांनी कापल्या. इंग्रजांच्या हातातून सुरक्षित निघाल्यानंतर भगत सिंग, सुखदेव आणि राजदेव यांनी आता धमाका करण्याचा निर्णय घेतला. यावेळी भगत सिंह म्हणाले, ‘इंग्रज बहिरे झाले आहेत. त्यांना कमी ऐकू येते. यासाठी मोठा धमाका गरजेचं आहे.’

८ एप्रिल १९२९ रोजी क्रांतिकारी बटुकेश्वरसह भगतसिंग यांनी ब्रिटिश सरकारच्याअसेंब्ली मध्ये बॉम्बस्फोट करून एकच खळबळ उडवून दिली. परंतु, हा बॉम्ब कोणालाही इजा होणार नाही अशा मोकळ्या जागेत फेकला. याचवेळेस त्यांनी इंकलाब जिंदाबादचे नारे लगावले. व स्वताला अटक करून घेतली.

जेलमध्येही भगत सिंग यांनी कैद्यांसाठी पुढाकार घेतला. कैद्यामध्ये भेदभाव, त्यांचे बरोबर असलेल्या सहकाऱ्यांना अतिशय घाणेरडे अन्न देण्यात येत होते. त्यांना वाचण्यासाठी, लिहिण्यासाठी कोणत्याही सोयी मिळत नव्हत्या, गणवेश अनेक दिवसात धुतले नव्हते. स्वयंपाघरात उंदीर झुरळे फिरायची या गोष्टी विरुद्ध त्यांनी आवाज उठविला व उपोषण सुरू केले.

१२ जून १९३० रोजी त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. पण पुढे खास न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आणि २३ मार्च १९३१ या दिवशी भगतसिंग, सुखदेव व राजगुरू हे देशासाठी शहीद झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)