जालना महोत्सवाचे नियोजन करा – बबनराव लोणीकर

जालना : जालना जिल्ह्याचे नाव देश तसेच राज्य पातळीवर पोहोचण्यासाठी जालना महोत्सव आयोजनाचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले. जालना शहरात 18 ते 22 मे, 2018 दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या जालना महोत्सव 2018 च्या पूर्वतयारीची आढावा बैठक लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी पशुसंवर्धन,दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी आमदार अरविंद चव्हाण, रामेश्वर भांदरगे, प्रभारी जिल्हाधिकारी पी.बी. खपले यांची उपस्थिती होती.

लोणीकर  यावेळी बोलताना  म्हणाले की, गेल्या अनेक वर्षानंतर  जालना शहरामध्ये अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ताणतणावापासून मुक्तता मिळावी व जिल्ह्यातील कलाकारांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा हा या कार्यक्रमामागचा मुख्य हेतू आहे. जालना महोत्सवामध्ये स्थानिक कलावंताना एक हक्काचे व्यासपीठ मिळणार असून या माध्यमातून त्यांना आपली कला सादर करता येणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
4 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)