जामखेड शहर उद्याही बंद;उद्या सर्व पक्षीय शांतता कमिटीची बैठक

जामखेड : जामखेड शहरातील दोन युवक योगेश राळेभात व राकेश राळेभात यांच्या हत्येच्या निषेधार्थ सलग दुसऱ्या दिवशी सोमवार ३० एप्रिल,२०१८ रोजी जामखेड शहर बंद ठेवण्यात येत आहे. जामखेड शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून गोळीबारांच्या घटनांनी शहर हादरले असून शहरात कायम दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, या सर्व पार्श्वभूमीवर विचारविनिमय करण्यासाठी व शहरात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी शहरातील सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था, सर्व छोटे-मोठे व्यवसायिक, व्यापारी, नागरिक यांची बैठक उद्या सोमवार ३० एप्रिल, २०१८ रोजी सकाळी ठिक १०:३० वा. महावीर भवन, जामखेड येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन समस्त शांतता कमिटी जामखेड शहर यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
124 :thumbsup:
25 :heart:
32 :joy:
1 :heart_eyes:
4 :blush:
36 :cry:
56 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)