जातीयवादी शक्‍तीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी समविचार पक्षांना एकत्र आणू- अजित पवार

महापालिकेबाबतचा निर्णय स्थानिकपातळीवर

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडी करून लढणार

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगर: आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडी करून लढणार आहे. याबाबत बुधवारी रात्री मुंबईत विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्या निवासस्थानी दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली आहे. मतांची विभागणी टाळण्यासाठी व जातीयवादी शक्‍तीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी समविचार पक्षांना एकत्र आणण्यात येणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार अजित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

सध्याचे केंद्र व राज्य सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. महागाई वाढत चालली असून पेट्रोलचा दर 100 रुपये झाला तर आर्श्‍चय वाटू नये, जातीय वाद वाढला आहे. त्यातून कायदा व सुवस्थेचा बोजवारा उडाला असून नोकर भरती बंद आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. रस्त्याची दुरावस्था झाली आहे, शेतमालाला भाव नाही. पाऊस नसल्याने दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. तरी सरकार याबाबत काही बोलयला तयार नाही. सरकारने तातडीने दुष्काळ जाहिर केला पाहिजे. यासर्व स्थितीला सरकार जबाबदार असून ते अपयशी ठरले आहे. आता हे मुद्दे घेवून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुक लढण्यात येणार असून त्यासाठी समविचार पक्षांची मोट बांधण्यात येत असल्याचे पवार म्हणाले.

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या दृष्टीने अनेक पक्षांबरोबर चर्चा सुरू केली आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी यापूर्वी आघाडीचा निर्णय घेतला आहे. आता अन्य समविचार पक्ष एकत्रित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जातीयवादी शक्‍तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे असे सांगून महापालिका निवडणुकीत आघाडी की स्वबळावर हा निर्णय स्थानिक पातळीवरील नेते घेणार आहे. त्यामध्ये प्रदेशकडून कोणताही हस्तक्षेप होणार नसल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)