जाणून घ्या: सायबर लुटारूंची कार्यपद्धती (भाग३)

जाणून घ्या: सायबर लुटारूंची कार्यपद्धती (भाग२)

सोशलमीडियाचा वापर – याची पुढची पायरी म्हणजे जेव्हा हॅकर्स तांत्रिक ज्ञानात तरबेज असतात आणि लोकांच्या मानसिकतेचा त्यांनी अभ्यास केलेला असतो तेव्हा अतिशय हुशारीने लूट केली जाते. या हॅकरनी तुमचा माहिती कुठून तरी विकत घेतलेली असते. त्याचबरोबर तुमच्या सोशल मिडियावरील खात्याचा आणि पोस्टचा त्याने बारकाईने अभ्यास केलेला असतो. तुमचा बॅंक खाते क्रमांक, आधार क्रमांक, जन्मतारीख, आईचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक या गोष्टी मिळवून तो तुमच्या फोन बॅंकिंगमध्ये प्रवेश करतो. त्यासाठी ते स्वतःचा क्रमांक लपवून तुमचा फोन नंबर दिसेल अशा तंत्रज्ञानाचा वापर करून बॅंकेत फोन करतात आणि बॅंक खात्याशी संलग्न ई-मेलसारख्या महत्त्वपूर्ण माहितीमध्ये बदल करण्याची विनंती करतात. एकदा का त्यांना नवा ई-मेल मिळाला की चेंज पासवर्ड सुविधेचा वापर करून तुमचा पासवर्ड रिसेट करतात आणि मग हा पासवर्ड तुमच्या मेलवर न येता त्याने बदलून घेतलेल्या नव्या ई-मेलवर जातो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कार्ड क्‍लोनिंग तर होत नाही ना- कार्डचे क्‍लोनिंग हा प्रकार साधारणपणे एटीएम सेंटरवर होतो. अनेकदा हे सायबर लुटारू फारसा वापर नसलेली एटीएम हेरतात आणि त्याठिकाणच्या एटीएममध्ये क्‍लोनिंग डिव्हाईस बसवतात. तुम्ही अशा एटीएममध्ये तुमचे एटीएम कार्ड सरकवले की त्यातील सगळी माहिती त्या डिव्हाईसवर कॉपी होते. मग त्यावरून तुमच्या एटीएम कार्डसारखेच नवे कार्ड बनवले जाते. काही ठिकाणी तुम्ही टाकत असलेला पिन क्रमांक कळावा यासाठी या लुटारूंनी कॅमेरे बसवल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कधीही पिन क्रमांक टाकताना तुमची कृती दुसऱ्या हाताने झाकावी. त्यामुळे अशा एकाकी ठिकाणी असलेल्या एटीएमचा वापर करताने तेथील कार्ड रिडर आणि पिन ऑपरेट करण्याचे पॅड याची बारकाईने पाहणी करा. ते नेहमीपेक्षा वर असल्याचे किंवा कार्ड इनसर्ट करतो ती खाच नेहमीपेक्षा मोठी असल्याचे दिसल्यास तेथून व्यवहार करणे टाळा. अनेकदा रेस्टॉरंटमध्ये तुमचे क्रेडिट कार्ड स्वाईप करण्यासाठी नेले जाते त्यावेळी देखील क्‍लोनिंग केले जाण्याची शक्‍यता असते. अगदी तुमच्यासमोर कार्ड स्वाईप केले तरी एखाद्या चलाख हॉटेल कर्मचाऱ्याने आधीच त्यामध्ये क्‍लोनिंग डिवाईस बसवलेले असू शकते.

या सगळ्या शक्‍यता लक्षात घेऊन आपले बॅंक खाते, मोबाईल क्रमांक, ई-मेल, एटीएम व क्रेडिट कार्डचा वापर अतिशय दक्षतेने व सावधगिरीने करणे आवश्‍यक आहे. मुख्य म्हणजे कुठूनही फोन आला तरी गडबडून न जाता आपली कुठलीही वैयक्तिक माहिती न देण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)