जाणून घ्या, शुद्ध पाण्याचे महत्त्व (भाग 1)

नळाद्वारे पाणी पुरवठा असेल तर पाईप लाईन कुठे फुटलेली आहे किंवा नादुरुस्त झाली आहे ते पाहून लगेच दुरुस्त करून घेतली पाहिजे. म्हणजे पाण्यामध्ये घाण मिसळणार नाही. पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय सृष्टीतला एकही जीव, वनस्पती जिवंत राहू शकत नाही. सजीव पाण्याशिवाय जगूच शकत नाहीत. पाण्याशिवाय धान्य उत्पादन नाही की उद्योगधंदे कारखाने नाहीत. पाणी इतके अमुल्य असतांना आपल्याला पाण्याचे महत्त्व अद्याप का समजत नाही?

डॉ. सचिन जाधव

नद्या, विहिरी, ओढे, हातपंप इत्यादींपासून आपल्याला पाणी मिळते. परंतु हे पाणी पिण्यास योग्य असतेच असे नाही. नदीकाठी विहिरीजवळ जनावरे धुणे, कपडे धुणे, भांडी घासणे अशी कामे केली जातात. शिवाय त्यामध्ये पालापाचोळा, धूळ वगैरे पडतच असते. त्यामुळे पाणी वारंवार दूषित होत असते. अशा पाण्यामुळे अतिसार, पटकी, विषमज्वर, कावीळ यासारखे घातक आजार होऊ शकतात. अनेकांना माहिती नसते की वरवर स्वच्छ दिसणाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा नुसत्या डोळ्यांना न दिसणारे अनेक जंतू असू शकतात. म्हणून पाणी वापरण्यापूर्वी पिण्यायोग्य म्हणजेच शुध्द करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जाणून घ्या, शुद्ध पाण्याचे महत्त्व (भाग 2)

पाणी जीवन आहे. माणसाला जगण्यासाठी पाणी आवश्‍यक आहे. माणसाला, जनावरांना, पक्षांना पिण्यासाठी पाणी लागते. जे सजीव आहेत त्यांना सर्वांना पाण्याची आवश्‍यकता आहे. आपल्या शरीराचा 70 % हून अधिक भाग हा पाण्यापासून बनलेला असतो. शरीराला निरनिराळ्या माध्यमातून पाण्याची गरज भासत असते आणि ही गरज या ना त्या प्रकाराने आपण भागवित असतो. पाचकरस आणि रक्त तयार होण्यापासून किंवा शहरातील टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्याच्या प्रकियेपर्यंत पाणी हाच घटक शरीरात काम करत असतो.

पिण्याच्या पाण्याची स्वच्छता कशी राखावी
पिण्याचे पाणी आणण्यासाठी नेहमी स्वच्छ भांडी वापरावीत, ते दररोज विसळावे, पाणी भरताना चारपदरी फडक्‍याने गाळून घ्यावे.
भांडी भरल्यानंतर त्यावर झाकण ठेवावे.
भांड्यातले पाणी पिताना पाण्यामध्ये अस्वच्छ हात बुडवले तर पाण्यात जंतू मिसळतात व वाढतात. म्हणूनच भांड्यातून पाणी काढण्यासाठी दांड्याचे भांडे वापरावे. पाणी पिण्यासाठी स्वच्छ पेला, तांब्या वापरावा.
साथीच्या दिवसांत पाणी उकळून प्यावे. पाणी कमीत कमी 20 मिनिटे उकळून घ्यावे. म्हणजे त्यातील रोगजंतू मारतात.
शक्‍यतो हातपंपाचे पाणी, पायऱ्या नसलेल्या विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरावे किंवा सार्वजनिक विहिरीत टी.सी.एल. टाकून ते पाणी पिण्यासाठी वापरावे; परंतु तिथे दररोज घाण होणार नाही याची काळजी घ्यावी.

आपण ज्यावेळी सार्वजनिक ठिकाणी जातो अशावेळी शक्‍यतो पाणी पिण्याचे टाळावे. कारण लग्न, धार्मिक समारंभ, शाळा, कॉलेज, यात्रा, मेळावे अशा ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाहिजे तेवढी काळजी घेतली जात नाही. शक्‍य असेल तेव्हा पाणी शुद्ध करण्यासाठी क्‍लोरीनयुक्त गोळ्यांचा वापर करावा. दररोज उकळून पाणी पिणे शक्‍य होत नसेल तर किमान आजारी माणसाला उकळून गार केलेले पाणी पिण्यास द्यावे. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासते. अशावेळी मिळेल त्या ठिकाणावरून लोक पाणी पिण्यासाठी आणतात. त्यामुळे ते पाणी पिण्यास योग्य असतेच असे नाही त्यामुळे त्याची खात्री करावी.

घरगुती पाणी पिण्यासाठी टाकीचा वापर करत असाल तर ती स्वच्छ धुतलेली पाहिजे. त्यावर झाकण ठेवलेले पाहिजे. सार्वजनिक ठिकाणच्या टाकीची व्यवस्था ठेवण्यासाठी ग्रामपंचायत किंवा कर्मचारी वर्ग यांनी दक्षता घेतली पाहिजे. ती आठवड्यातून एकदातरी साफ केलीच पाहिजे.

निसर्गचक्रानुसार पाऊस पडतो. काही ठिकाणी तर अतिसृष्टी होते. पण तरीही उन्हाळ्याचे शेवटचे दोन महिने संपूर्ण पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. हे सगळ्या देशातलेच चित्र. परिस्थिती इतकी बिकट की, एव्हाना माणसे पाण्यासाठी एकमेकांच्या जीवावरही उठू लागली आहेत.त्यामुळेच पाण्याचे महत्त्व प्रत्येकाने जाणून घेण्याची गरज आज निर्माण झाली आहे.

पिण्याचे स्वच्छ आणि मुबलक पाणी ही जीवनाची एक मुलभूत गरज आहे. पाणी टंचाईचे प्रमुख कारण म्हणजे पाण्याचा जमाखर्च बिघडणे. एकीकडे शहरांसाठी आणि शेतीसाठी पाण्याचा वाढता वापर ही झाली पाण्याचा वाढत्या खर्चाची बाजू, मात्र जमिनीच्या पोटातल्या साठ्यात भर पडत नाही. तसेच जमिनीच्या वरच्या थराची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झाली आहे.यामुळे पाण्याच्या जमेची बाजू लंगडी झालेली आहे. पर्यावरण बिघडल्याने पाणी जिरण्याची क्रिया दुबळी झालेली आहे. आता आपल्याला पाणी अडवा-जिरवा कार्यक्रम आवश्‍यक आहे.
पाणी टंचाईचे कारण काही असले तरी त्याचे परिणाम आरोग्याच्या दृष्टीने घातक आहेत.

पाणी टंचाईमुळे स्वच्छता राहात नाही. पुरेसे पाणी असणे हे ते शुद्ध असण्याइतकेच महत्त्वाचे आहे. शहरी वस्तीला दरडोई 200 लिटर (किमान 40 लिटर) रोज इतकी गरज गृहीत धरतात. (अनेक मोठएा शहरात आता इतके पाणी मिळू शकत नाही.) खेड्यात शेतीसाठी होणारा पाण्याचा वापर सोडला तर दरडोई 200 लिटर हीच गरज धरायला पाहिजे. प्रत्यक्षात मात्र पाण्यासाठी मैलोन्‌मैल लांब पायपीट करावी लागते आणि प्रसंगी वाटीवाटीने घागरीत भरून पाणी आणावे लागते.

पाणी टंचाईमुळे मिळेल ते पाणी वापरावे लागते. अयोग्य वापराने असणारे साठे अशुद्ध होतात त्यामुळे शुद्ध पाणी मिळण्याची शक्‍यता कमी होते. अशुद्ध पाणी व कमी पाणी या दोन्हींचे आरोग्यावर होणारे परिणाम घातक आहेत. आपल्याकडचे निम्मे आजार अशुद्ध पाणी आणि अस्वच्छतेमुळे होतात. पटकी, गास्ट्रो, पोलियो, कावीळ, हगवण, जंत, त्वचारोग, विषमज्वर इत्यादी अनेक आजार अशुद्ध पाणी व अस्वच्छता यामुळेच होतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)